शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मतदान केंद्रावर रॅम्प सुविधा बंधनकारक

By admin | Updated: February 18, 2017 03:45 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात ३ हजार ३६९ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. या केंद्रावर

पुणे: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात ३ हजार ३६९ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. या केंद्रावर अपंग, वृद्ध आणि आजारी मतदारांना मतदान करण्यासाठी कोणत्याही स्वरूपाची अडचण येऊ नये, यासाठी शंभर टक्के केंद्रांवर तात्पुरते रॅम्प करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. जिल्ह्यात सध्या २७ लाख ९२ हजार मतदार आहे असून, हजार ते बाराशे मतदारांसाठी एक मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे. ग्रामीण भागात बहुतेक मतदान केंद्र शाळांमध्येच असल्याने रॅम्पची सुविधा असते. परंतु काही ठिकाणी ही सुविधा नाही व काही केंद्र पहिल्या मजल्यावरदेखील आहेत. अशा वेळी अपंग, वृद्ध लोकांना त्रास झाल्यास मतदान करण्यास टाळाटाळ होऊ शकते. याचा परिणाम मतदानावर होतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे अंपग व वृद्ध मतदारांना मतदान करता यावे, यासाठी अशा सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा, वीज, शौचालय, निवाऱ्याची सोय करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.