शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

‘बिल्डरशाही’ने गिळली ‘रामनदी’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2019 2:05 PM

‘‘आमच्या लहानपणी आम्ही रामनदीत पोहलो. याच नदीचे पाणीदेखील प्यालो. पण गेल्या काही वर्षांत बिल्डरशाहीने रामनदीचे अस्तित्व धोक्यात आणले आहे.

ठळक मुद्देराम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या उद्घाटनाला गावकऱ्यांचा संतप्त सवाल

सुषमा नेहरकर पुणे : ‘‘आमच्या लहानपणी आम्ही रामनदीत पोहलो. याच नदीचे पाणीदेखील प्यालो. पण गेल्या काही वर्षांत बिल्डरशाहीने रामनदीचे अस्तित्व धोक्यात आणले आहे. नदीच अस्तित्वच न राहिल्याने पुनरुज्जीवन कशाचे आणि कसे करणार? केवळ गाळ काढणे, प्लॅस्टिकबंदी करून काय उपयोग होणार? मुळावर घाव घातल्याशिवाय काही होणार नाही,’’ अशी संतप्त प्रतिक्रिया ‘राम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच’ उद्घाटन कार्यक्रमातच स्थानिक ज्येष्ठ ग्रामस्थांनी व्यक्त केली.मुळशी तालुक्यात उगम असलेली रामनदी वर्पेवाडी, खाटपेवाडी, भुकूम, भूगाव, बावधन, सुतारवाडी करत पाषाण, सोमेश्वरवाडी, बाणेर, औंध असा १८ किमीचा प्रवास करत मुळा नदीला मिळते. यामध्ये भुकूम, भूगाव आणि बावधन या तीन ग्रामपंचायती रामनदीच्या काठावर वसल्या आहेत. परंतु, गेल्या काही वर्षांत प्रचंड मोठ्या प्रमाणात उभा राहिलेल्या सिमेंटच्या जंगलामुळे नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. यामुळे रामनदी पुन्हा पुनरुज्जीवित करण्यासाठी पुणे शहर आणि परिसरातील विविध १३ स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन ‘रामनदी पुनरुज्जीवन प्रकल्प’ हाती घेतला आहे. या प्रकल्पाचा आरंभ मंगळवार (दि.४) रोजी खाटपेवाडी तलाव येथे महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेवक दिलीप वेडे-पाटील, माधुरी सहस्रबुद्धे, किर्लोस्कर ऑइल कंपनीचे सीईओ आर. आर. देशपांडे याच्यासह सर्व १३ स्वयंसेवी संस्थांचे प्रमुख, स्थानिक गावांमधील सरपंच, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते..........राम नदीला गतवैभव देऊ* महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘‘पाण्याचा, नद्यांच्या स्वच्छतेचा प्रश्न केवळ पुणे महापालिका,  ग्रामपंचायतींचा किंवा तुमचा, आमचा किंवा त्यांचा राहिला नसून, तो जागतिक झाला आहे. त्यामुळे रामनदीचे पुनरुज्जीवनासाठी महापालिका हद्दीच्या बाहेरदेखील विशेष बाब म्हणून पूर्ण मदत करण्यास तयार आहे.

* रामनदीच्या पुनर्जीवन अडथळा आणणाऱ्या , राडारोडा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही टिळक यांनी यावेळी स्पष्ट केले. महापालिकेने रामनदीवर आतापर्यंत ५ कोटी रुपये खर्च केले आहेत. परंतु, याचा प्रत्यक्ष काही फायदा झालेला दिसत नसल्याचे सांगत आता स्वयंसेवी संस्था, ग्रामस्थांचा पुढाकारातून रामनदीला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Puneपुणेriverनदी