The Rajiv Gandhi Zoo Park in Pune is equipped with various solutions Against fight Corona | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय विविध उपाययोजनांसह सज्ज 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय विविध उपाययोजनांसह सज्ज 

ठळक मुद्देप्राण्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना.

पांडुरंग मरगजे - 
पुणे : मानवाकडून मानवाला होणाऱ्या संसगार्मुळे कोरोनाचा फैलाव वेगाने होत असतानाच नुकतेच अमेरिकेत वाघिणीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आल्यामुळे आता प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील प्राण्यांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असून खबरदारी म्हणून बाहेरून प्राण्यांसाठी खाद्य घेऊन येणाऱ्या वाहनांचे निजंर्तुकीकरण करण्यात येत आहे, प्राण्यांची विशेष काळजी घेताना स्वच्छता राखण्याच्या सुचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या शिवाय कर्मचाऱ्यांच्या तपासण्या करून घेण्याचे प्रयत्न करीत आहोत, अशी माहिती प्राणी संग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली. 
पुणे शहरात उन्हाची तीव्रता वाढली असून प्राणी उकाड्याने हैराण झाले आहेत. त्यातच कोरोनाचा संसर्ग प्राण्यांनाही होत असल्याचा प्रकार समोर आल्याने प्राणी संग्रहालय प्रशासनावर दुहेरी जबाबदारी येऊन पडली आहे. एकीकडे उन्हाच्या तीव्रतेपासून प्राण्यांचा बचाव करणे तर दुसरीकडे प्राण्यांना कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करणे. 


राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये महिन्यापूर्वीच दाखल झालेल्या पवन या सिंहाबरोबरच हत्ती, बिबट्या, अस्वल, हरण, साळिंदर, सांबर, निलगाय, वेगवेगळ्या प्रजातीचे पशू पक्षी, साप अशा ६७ प्रकारचे ४०० प्राणी आहेत.
देशभरातील प्राणी संग्रहालयाबरोबरच राजीव गांधी प्राणी संग्रहालय सध्या बंद आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राण्यांना खाद्य देताना स्वच्छता राखणे, सफाईसाठी येणाऱ्या  कर्मचाऱ्यांनी हातमोजे, मास्क वापरून तसेच विशेष संरक्षक घालून सोशल डिस्टंसिंग पालन करत काम करण्याच्या सुचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

राजकुमार जाधव म्हणाले मानवाकडून प्राण्यांना संसर्ग होण्याची शक्यता समोर आल्याने आमच्या चिंता वाढल्या आहेत. या अनुषंगाने प्राण्यांची काळजी घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने सुरक्षा उपकरणांविना प्राण्यांचा जवळ जाऊ नये, त्यांच्याशी कमीत कमी संपर्क येईल याची काळजी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

............................
 अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील ब्राँक्स या प्रसिद्ध प्राणी संग्रहालयात नादिया या चार वर्षांच्या वाघिणीला कोरोनाची लागण झाल्याची जगातील पहिलीच घटना समोर आली. या संग्रहालयातील प्राण्यांची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाला होता त्याच्यापासून या वाघिणीला लागण झाली असल्याचे मत वैद्यकीय आधिकाऱ्यांनी व्यक्त केले त्यामुळे प्राणी संग्रालयातील कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याची गरज आहे. त्याचबरोबर आगामी काळात प्राण्यांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना करता येतील हे पाहावे लागणार आह

Web Title: The Rajiv Gandhi Zoo Park in Pune is equipped with various solutions Against fight Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.