शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

जिल्ह्यातील धरणक्षेत्रात संततधार पाऊस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 21:09 IST

जून महिन्यात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारली होती. धरणसाखळीत बुधवारी पहिल्या जोरदार पावसाची नोंद झाली.

ठळक मुद्देपहिला दमदार पाऊस : खडकवासला साखळीतील उपयुक्त पाणीसाठ्यात होऊ लागली वाढपानशेत धरणात २.९९ आणि खडकवासला धरणात ०.७३ टीएमसी पाणीसाठा

पुणे : जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली असून, खडकवासला साखळीतील टेमघर आणि वरसगाव धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. बुधवारी (दि. ४) सायंकाळी साडेपाच नंतरच्या चोवीस तासांत टेमघरमधे २२४, वरसगाव १६७, पानशेत १६० आणि खडकवासल्याला ९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जून महिन्यात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारली होती. धरणसाखळीत बुधवारी पहिल्या जोरदार पावसाची नोंद झाली. खडकवासला साखळीतील टेमघर धरणात गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ११९, तर गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तब्बल १०५ मिलिमीटर पाऊस झाला. वरसागवला गुरुवारी सकाळ पर्यंत ७२ आणि सायंकाळी साडेपाच पर्यंत ९५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणाच्या दुरुस्तीकामामुळे टेमघर आणि वगरसाव धरणातील पाणीसाठा उणे होता. दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे येथील उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. टेमघर धरणातील पाणीसाठा ०.२७ आणि वरसगाव धरणात ०.०६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. पानशेत धरण पाणलोटक्षेत्रात गुरुवारी सकाळपर्यंत ७२ आणि सायंकाळी साडेपाच पर्यंत ८८, तर खडकवासला धरण क्षेत्रात गुरुवारी सकाळपर्यंत २३ आणि सायंकाळपर्यंत २० मिलिमीटर पाऊस झाला. पानशेत धरणात २.९९ आणि खडकवासला धरणात ०.७३ टीएमसी पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील सर्वच धरणक्षेत्रात पावसाने हजेरी लावली. भाटघर धरणात गुरुवारी सकाळपर्यंत १२, नीरादेवघर ४४, वीर ३ आणि नाझरे धरणक्षेत्रात २ मिलिमीटर पाऊस झाला. गुंजवणे धरण क्षेत्रात गुरुवारी सकाळपर्यंत ६० आणि सायंकाळी साडेपाचपर्यंत २७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पिंपळगाव जोगे धरण परिसरात सकाळपर्यंत १३, माणिकडोह २७, येडगाव १६, वडज १७ आणि डिंभे धरणक्षेत्रात २० मिलिमीटर पाऊस झाला. तर, दिवसभरात येथील धरणक्षेत्रात २ ते ५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. चासकमानला गुरुवारी सकाळपर्यंत २३ आणि सायंकाळपर्यंत ३०, पवना येथे सकाळी १०३ आणि सायंकाळपर्यंत ६० मिलिमीटर पाऊस झाला. कासारसाईला सकाळपर्यंत ४१ आणि सायंकाळपर्यंत २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मुळशी धरण क्षेत्रात गुरुवारी सकाळी साडेआठ पर्यंत १२८ आणि सायंकाळी साडेपाचपर्यंत ६६ मिलिमीटर पाऊस झाला.   

टॅग्स :PuneपुणेDamधरणRainपाऊस