शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Monsoon Update:येरे येरे पावसा...! मॉन्सूनची अंदमानात ‘एन्ट्री’; महाराष्ट्रातही वेळेपूर्वी दाखल होणार

By श्रीकिशन काळे | Updated: May 19, 2024 16:51 IST

दक्षिण कोकणात ५ जून रोजी दाखल होईल आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात १५ जूनपूर्वी मॉन्सून प्रवेश करेल

पुणे: ज्याची आतुरतेने शेतकरी राजा वाट पाहतो, त्या मॉन्सूनचे आगमन रविवारी (दि.१९) अंदमानात झाले अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तसेच या मॉन्सूनला कसलाही अडथळा येणार नसल्याने तो वेगाने पुढे सरकणार आहे. हवेचे दाब कमी होण्यास अतिउष्ण हवामान कारणीभूत ठरत असून, मॉन्सून महाराष्ट्रात वेळेपूर्वी दाखल होईल, अशी सध्याची हवामानाची स्थिती आहे.

सध्या नैऋत्य मॉन्सून मालदीव, दक्षिण बंगालचा काही भाग, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात दाखल झाला आहे. वातावरणाच्या खालच्या स्तरातील द्रोणीका रेषा उत्तर प्रदेश ते मध्य महाराष्ट्रापर्यंत जात आहे. मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागांवर चक्रीय स्थिती निर्माण झालेली आहे. कोकणात रविवारी (दि.१९) व पुढील दोन दिवस बऱ्याच जिल्ह्यांत वातावरण दमट व उष्ण असेल, तर रत्नागिरीत २० ते २३ मे पर्यंत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्गमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे कोकणात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. २१ व २२ मे ला सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. तर मध्य महाराष्ट्रात आज रविवारी (दि.१९) व २१ व २२ मे रोजी यलो अलर्ट दिला. मराठवाड्यात २२ मे पर्यंत बऱ्याच जिल्ह्यांत यलो अलर्ट आहे. दरम्यान, पुणे व परिसरात २१ ते २५ मे पर्यंत आकाश निरभ्र राहील. विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज दिला आहे.

मॉन्सूनचा प्रवास !

सध्या उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व पश्‍चिम महाराष्ट्रातील काही भागातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. हे तापमान ४३ ते ४४ अंशांपर्यंत वाढेल. त्यामुळे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. मॉन्सून श्रीलंकेवर २६ मे दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे. तर केरळमध्ये ३१ मे, तसेच दक्षिण कोकणात ५ जून रोजी दाखल होईल आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात १५ जूनपूर्वी मॉन्सून प्रवेश करेल, असा अंदाज देण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रkonkanकोकणTemperatureतापमानenvironmentपर्यावरणHealthआरोग्यmonsoonमोसमी पाऊस