Pune | वडगाव परिसरातीली जुगार अड्ड्यावर छापा; ७ लाख ५९ हजारांचा ऐवज जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 11:40 IST2023-04-17T11:35:36+5:302023-04-17T11:40:01+5:30

याबाबत वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

Raids on gambling dens in Vadgaon area; 7 lakh 59 thousand instead seized | Pune | वडगाव परिसरातीली जुगार अड्ड्यावर छापा; ७ लाख ५९ हजारांचा ऐवज जप्त

Pune | वडगाव परिसरातीली जुगार अड्ड्यावर छापा; ७ लाख ५९ हजारांचा ऐवज जप्त

वडगाव मावळ (पुणे) : वडगाव पोलिसांच्या हद्दीत चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी छापा टाकून ७ लाख ५९ हजारांचा ऐवज जप्त केला.

लोणावळा विभागीय पोलिस कार्यालय यांनी दिलेल्या माहितीनुसार वडगाव मावळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत सातेगावात भुंडे वस्ती येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार खेळत असल्याची माहिती सत्यसाई कार्तिक यांना मिळाली. रात्रीच्या वेळी पोलिस हवलदार सचिन देशमुख, अंकुश नायकवडी, सुभास शिंदे, अंकुश पवार, दत्ता शिंदे, चालक होले यांनी या ठिकाणी छापा मारला असता त्या ठिकाणाहून रोख रक्कम, किया कार, मोटारसायकल, चार मोबाइल जप्त करण्यात आले. याबाबत वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुगार अड्ड्यावर वरिष्ठांचा छापा

शनिवारी रात्री या अड्ड्यावर लोणावळा विभागीय पोलिसांनी छापा टाकला. वडगाव हद्दीत असल्याने सदरचा गुन्हा वडगाव पोलिस ठाण्यात दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतल्याचे समजते.

Web Title: Raids on gambling dens in Vadgaon area; 7 lakh 59 thousand instead seized