थोरांदळेत हॉटेलवर छापा; साडेचार हजारांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:11 IST2021-02-15T04:11:37+5:302021-02-15T04:11:37+5:30

मंचर : थोरांदळे (ता. आंबेगाव) येथे हॉटेल गीताई परमिट रूम बिअर बारमध्ये मंचर पोलिसांनी छापा टाकून साडेपाच हजार रुपये ...

Raids on hotels in Thorandale; Four and a half thousand gutkas seized | थोरांदळेत हॉटेलवर छापा; साडेचार हजारांचा गुटखा जप्त

थोरांदळेत हॉटेलवर छापा; साडेचार हजारांचा गुटखा जप्त

मंचर : थोरांदळे (ता. आंबेगाव) येथे हॉटेल गीताई परमिट रूम बिअर बारमध्ये मंचर पोलिसांनी छापा टाकून साडेपाच हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे.

याप्रकरणी सागर संतोष वाघ व अमोल मारुती आरगडे याच्याविरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थोरांदळे येथील हॉटेल गीताई परमिट रूम अँड बिअर बारमध्ये गुटखा विक्री केली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस नाईक अजित मडके, पोलीस जवान सुदर्शन रोडे यांनी मंचर- रांजणी रस्त्यावर असणाऱ्या या हॉटेलवर छापा मारला. पोलीस आल्याचे पाहून काऊंटरवर असणारा इसम प्लॅस्टिकच्या पिशवीत असणारा गुटखा झाकत पळू लागला. पोलिसांनी त्याला पकडले. अमोल मारुती अरगडे (वय २२, रा. भराडी, ता. आंबेगाव) असे नाव त्याने सांगितले. यावेळी हॉटेल मालक सागर वाघ विक्रीसाठी गुटखा आणून देत असल्याचे अरगडे यांनी सांगितले. पिशवीत विमल कंपनीच्या गुटख्याचे पुडे आढळून आले. त्याची किंमत पाच हजार पाचशे पन्नास रुपये आहे.

Web Title: Raids on hotels in Thorandale; Four and a half thousand gutkas seized