पुणे : कोरेगाव पार्क परिसरातील एका स्पा सेंटरवर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानव वाहतूक व व्यापार प्रतिबंध पथकाने छापा टाकून वेश्याव्यवसाय उघडकीस आणला. या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली असून एका महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्रीती ऋषिकेश नायर (वय २१) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढोले पाटील रोडवरील, सिद्धार्थ कोर्ट बिल्डिंगजवळ ‘किन्नरी सलून अँड स्पा’ या नावाखाली सुरू असलेल्या स्पा सेंटरमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय केला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार पोलिस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली बनावट ग्राहक पाठवून खात्री करून घेत छापा टाकण्यात आला. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच प्रीती नायर हिला अटक केली आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा १९५६ अंतर्गत कलम ३, ४, ५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
Web Summary : Pune police raided a Koregaon Park spa, uncovering a prostitution ring. Two women were rescued, and one woman, Preeti Nair, was arrested. The raid followed a tip-off about the Kinnari Salon & Spa. A case has been registered under the Prevention of Immoral Trafficking Act.
Web Summary : पुणे पुलिस ने कोरेगांव पार्क के एक स्पा पर छापा मारकर वेश्यावृत्ति का भंडाफोड़ किया। दो महिलाओं को बचाया गया, और एक महिला, प्रीति नायर, को गिरफ्तार किया गया। यह छापा किन्नरी सैलून एंड स्पा के बारे में मिली जानकारी के बाद मारा गया। अनैतिक मानव तस्करी निवारण अधिनियम के तहत मामला दर्ज किया गया है।