सेनापती बापट रस्त्यावरील दुकानावर छापा; बंदी असलेले अडीच लाखाचे ई सिगारेट जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 19:12 IST2025-11-05T19:12:15+5:302025-11-05T19:12:26+5:30
सेनापती बापट रोडवरील द shack शॉप या दुकानात बंदी असलेल्या ई-सिगारेट, हुक्का फ्लेव्हर आणि इतर साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले होते

सेनापती बापट रस्त्यावरील दुकानावर छापा; बंदी असलेले अडीच लाखाचे ई सिगारेट जप्त
पुणे: गुन्हे शाखा युनिट ४ ने बंदी असलेल्या ई-सिगारेटची अवैध विक्री करणाऱ्या इसमावर कारवाई केली आहे. सेनापती बापट रोड परिसरातील दुकानातून बेकायदेशीररीत्या ई-सिगारेट आणि हुक्का फ्लेव्हर विकले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर युनिट ४ च्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनापती बापट रोडवरील द shack शॉप या दुकानात बंदी असलेल्या ई-सिगारेट, हुक्का फ्लेव्हर आणि इतर साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दुकानावर छापा टाकून सुमारे २ लाख ४० हजार रुपयांच्या किंमतीचा माल जप्त केला. ही विक्री करणारा इसम चेतन धर्मराज सावंत (वय २४, रा. शांतिनगर हौसिंग सोसायटी, घर क्र. ९, चिखली, निगडी, पुणे) याच्यावर चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे (युनिट ४) यांच्यासह त्यांच्या पथकाने केली. दरम्यान गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे बंदी असलेल्या ई-सिगारेट आणि हुक्का फ्लेव्हर विक्रीवर अंकुश बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.