Pune: वेहेरगावात मटका अड्ड्यावर छापा; १६ जणांवर गुन्हा, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 17:47 IST2023-12-30T17:46:08+5:302023-12-30T17:47:21+5:30

यात अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला....

Raid on Matka hideout in Vehergaon; Crime against 16 people, goods worth 2.5 lakh seized | Pune: वेहेरगावात मटका अड्ड्यावर छापा; १६ जणांवर गुन्हा, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune: वेहेरगावात मटका अड्ड्यावर छापा; १६ जणांवर गुन्हा, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

लोणावळा (पुणे) : चोरून मटका चालविणाऱ्या व खेळणाऱ्या १६ जणांवर लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा मटका चंद्रकांत देवकर, शंकर बोरकर, नीलेश बोरकर, संतोष बोत्रे (रा. वेहेरगाव, ता. मावळ) चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. उपविभागाचे सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली वेहेरगावात ही कारवाई करण्यात आली. यात अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कार्तिक यांनी पोलिस पथकाला २९ डिसेंबर रोजी वेहेरगावात पाठविले असता, मोकळ्या रानामध्ये झाडाखाली मटका खुलेआम सुरू होता. तेथे टाकलेल्या छाप्यामध्ये मटका घेणारे दोन एजंट व मटका लावणारे १० जण यांना ताब्यात घेण्यात आले असून, रोख रक्कम व इतर असा एकूण अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सहायक पोलिस निरीक्षक सचिन राऊळ, पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व भारत भोसले, नितेश कवडे, सचिन गायकवाड, अंकुश नायकुडे, रईस मुलाणी, सुभाष शिंदे, सागर दळवी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Raid on Matka hideout in Vehergaon; Crime against 16 people, goods worth 2.5 lakh seized