शिक्रापूरच्या सणसवाडीत गुटखा अड्ड्यावर छापा; तब्बल वीस लाखांचा गुटखा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 20:34 IST2021-08-25T20:34:14+5:302021-08-25T20:34:22+5:30
सणसवाडीत नरेश्वर मंदिराच्या पाठीमागे आरोपी त्याच्या खोलीत मोठ्या प्रमाणात गुटख्याची साठवणूक करत होता

शिक्रापूरच्या सणसवाडीत गुटखा अड्ड्यावर छापा; तब्बल वीस लाखांचा गुटखा जप्त
कोरेगाव भीमा : अनेक ठिकाणी अवैध्य व्यवसायांवर शिक्रापूरपोलिसांचे छापे सुरू असताना आता पथकाने गुटखा अड्ड्यावर छापा टाकून तब्ब्ल तब्बल वीस लाख साठ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी कल्लू गुप्ता याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सणसवाडीत नरेश्वर मंदिराच्या पाठीमागे गुप्ता त्याच्या खोलीत मोठ्या प्रमाणात गुटख्याची साठवणूक करत असे. ते तंबाखूजन्य पदार्थ बनवून नागरिकांना विक्री केले जात असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांच्या पथकाला मिळाली.
त्यानंतर पथकाने सणसवाडी मंदिराच्या पाठीमागे त्याच्या घरात पाहणी केल्यावर तंबाखूजन्य पदार्थ आणि गुटख्याची १६०० पाकिटे आढळून आली. पोलिसांनी हा वीस लाख साठ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला असून याबाबत गुप्तावर गुन्हा दाखल करण्यात आल आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी हे करत आहे.