बारामती अग्रोवर केंद्रीय तपास यंत्रणेची धाड?, कंपनी प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 13:07 IST2024-01-05T13:06:59+5:302024-01-05T13:07:56+5:30

तसेच केंद्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांचा देखील संपर्क होऊ शकलेला नाही....

Raid by Central Investigation Agency on Baramati Agro, no official confirmation from company administration | बारामती अग्रोवर केंद्रीय तपास यंत्रणेची धाड?, कंपनी प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा नाही

बारामती अग्रोवर केंद्रीय तपास यंत्रणेची धाड?, कंपनी प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा नाही

बारामती : पिंपळी (ता. बारामती)येथील बारामती ऍग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणांनी धाड टाकल्याची प्राथमिक माहिती सुत्रांनी दिली. मात्र याबाबत कंपनी प्रशासन अथवा कंपनीचे सर्वेसर्वा रोहित पवार यांच्याकडून कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

शुक्रवारी (दि. ५)सकाळी कंपनीत केंद्रीय तपास यंत्रणा पोहोचल्याचे समजते. या ठिकाणी माध्यम प्रतिनिधी माहिती घेण्यास तळ ठोकून आहेत. मात्र या धाडीबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. तसेच केंद्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांचा देखील संपर्क होऊ शकलेला नाही.

Web Title: Raid by Central Investigation Agency on Baramati Agro, no official confirmation from company administration