Amit Shah: राहुल गांधी हे हरल्यानंतर अहंकारी बनले; अमित शहांचा राहुल गांधीवर निशाणा
By श्रीकिशन काळे | Updated: July 21, 2024 16:43 IST2024-07-21T16:43:29+5:302024-07-21T16:43:46+5:30
देशाचे सरकार भाजपच बनवेल हे जनतेने ठरवले आहे. म्हणून तिसऱ्यांदा आपले सरकार आले

Amit Shah: राहुल गांधी हे हरल्यानंतर अहंकारी बनले; अमित शहांचा राहुल गांधीवर निशाणा
पुणे : मी अनेक जयपराजय पाहिले आहेत. पण जिंकल्यावर अहंकार येतो. राहुल गांधी हे हरल्यानंतर अहंकारी बनले आहेत. जनतेने मोदींच्या कामावर मोहोर लावली आहे. म्हणून तर मोदी विजयी झाले. आपल्या २४० जागा आल्या. अजून थोडी कसर राहिली आहे, आता ती भरून काढू. विधानसभेला पुन्हा भगवा फडकावू. देशाचे सरकार भाजपच बनवेल हे जनतेने ठरवले आहे. म्हणून तिसऱ्यांदा आपले सरकार आले असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन बालेवाडीमधील क्रीडा संकुलात रविवारी (दि.२१) पार पडले. त्यामध्ये अमित शहा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, अशोक चव्हाण, सरचिटणीस विनोद तावडे, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, पियूष गोयल, आशिष शेलार, अश्विनी वैष्णव, चंद्रकांत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आपले ध्येय सर्वोच्च असायला हवे
साठ वर्षानंतर पहिल्यांदा एका नेत्याला तिसर्यांदा पंतप्रधानपदावर मोदींची बनले आहेत. आता विधानसभेमध्येही विजय मिळवायचा आहे. मला कार्यकर्ते भेटत आहेत. पण साशंकता आहे. विरोधकांनी इथे काही संभ्रम निर्माण केला आहे. आपले ध्येय सर्वोच्च असायला हवे. जो विजयी होतो, त्याचेच सरकार बनते. भारतात आपले सरकार बनले आहे आणि आपण विजयी झालो आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
संविधान दिन आम्ही सुरू केला
राहुलबाबा खटाखट वर भरोसा केला नाही. राज्य सरकार आहेत. तिथे खटाखट पैसे पाठवून द्या ना. कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल बहिणींना आवाहन करतो अशी योजना मागा. आम्ही महाराष्ट्रात अनेक कामे केली. समृद्दी राजमार्ग, अटल सेतू, मेट्रो, जलयुक्त शिवार आदी कामे केली. २०१४-१९ चा कार्यकाळ हा विकासाचा होता. आम्ही गरीबांचा, आदिवासींचा विचार करतो. आंबेडकर यांचा अपमान काॅग्रेसने केला तेवढा इंग्रजांनी देखील केला नाही. आंबेडकारंना भारतरत्न नाही दिला. संविधान दिन आम्ही सुरू केला असल्याचे शहा यावेळी म्हणाले आहेत.