शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

पाण्याअभावी रब्बी हंगाम गेला वाया; गेल्या वर्षीच्या तुलनेत ६० टक्क्यांनी घट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 2:22 AM

केवळ २४ टक्के क्षेत्रावरील पेरणी पूर्ण

पुणे : जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. दुष्काळाचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामाला बसला आहे. यावर्षी पाण्याअभावी जवळपास पूर्ण हंगाम वाया गेला आहे. आतापर्यंत ९२ हजार २०८ हेक्टरवरील म्हणजेच केवळ २४ टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत लागवडीच्या क्षेत्रात ६० टक्क्यांनी घट झाली आहे. गहू, ज्वारी आणि मक्याच्या क्षेत्रातही गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. यामुळे चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे.जिल्ह्यात खरिपापाठोपाठ रब्बी हंगामात महत्त्वाची पिके घेतली जातात. ज्वारी, गहू, मका, हरभरा, तृणधान्य, कडधान्य ही प्रमुक पिके या हंगामात घेतली जातात. मात्र, पाणीच नसल्याने शेतकºयांनी लागवडी केल्याच नाहीत. दरवर्षी सरासरी ३ लाख ९१ हजार १४ हेक्टरवर रब्बीची पिके घेतली जातात. मात्र, यावर्षी केवळ ९२ हजार २०८ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षी आतापर्यंत २ लाख ३५ हजार २८८ क्षेक्टररील पेरण्या पूर्ण झाल्या होत्या.या वर्षी परतीचा पाऊस झाला नसल्याने रब्बी पिकांचे नुकसान झाले. तुरळक पावसामुळे पिकांना पाहिजे तसा फायदा झाला नाही. ढगाळ हवामानाचाही या पिकांना फटका बसला. यामुळे हातातोंडाशी आलेले पीकही शेतकºयांना मिळाले नाही. या वर्षी ज्वारीचे सरासरी पेरणीक्षेत्र १ लाख ५७ हजार ८१४ हेक्टर येवढे होते. मात्र, केवळ ६४ हजार ३८ हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत ज्वारीच्या लागवडीत जवळपास ५९ टक्क्यांनी घट झाली आहे. गव्हाचे सरासरी पेरणीक्षेत्र ४७ हजार ९७१ हेक्टर होते. या पैकी केवळ ६ हजार ४ हेक्टरवर गव्हाच्या पेरण्या झाल्या. रब्बी तृणधान्य पिकांचे क्षेत्र जवळपास २ लाख २४ हजार ८४९ हेक्टर होते. मात्र, केवळ ७८ हजार ३६६ हेक्टरवर पेरण्या झाल्या. रब्बी कडधान्याच्या लागवडीतही या वर्षी मोठी घट झाली आहे. यामुळे एकंदर हा हंगामच शेतकºयांचा वाया गेल्याने हे वर्ष काढायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.कांदा, ऊस पिकांचेही नुकसानकांद्याला भाव नसल्यामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. या वर्षी रब्बीच्या कांदा लागवडीच्या क्षेत्रातही घट झाली आहे. गेल्या वर्षी ५० हजार ५७२ हेक्टरवर कांदा लागवडी झाल्या होत्या. यावर्षी २६ हजार ९७२ हेक्टरवर कांदा लागवडी झाल्या. गेल्या वर्षीच्या तूलनेत कांदालागवडीत १९ टक्कांनी घट झाली आहे.रब्बी हंगामातील ऊस लागवडीचे सरासरी क्षेत्र १ लाख ३० हजार ६३० हेक्टर एवढे होते. गेल्या वर्षी ९२ हजार ११४ हेक्टरवरील ऊस लागवडी पूर्ण झाल्या होत्या. मात्र यावर्षी २९ टक्के म्हणजेच ३८ हजार ११ हे. क्षेत्रावरील पूर्ण झाल्या असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ४१ टक्कांनी उस लागवडीत घट झाली आहे.चारा पिकांचेही नुकसानयावर्षी रब्बी हंगामातील चारा पिकांचे मोठे नुकसान झाले. गेल्या वर्षी २९ हजार ४७९ हेक्टरवर चारापिके लावण्यात आली होती. मात्र, यावर्षी २२ हजार ३०६ हेक्टवर चारापिके लावण्यात आली. चारा पिकांबरोबरच भाजीपाला पिकांचे क्षेत्रही गेल्या वर्षीच्या तूलनेत ४३ टक्यांनी घटली आहे. मसाला पिकांचेही क्षेत्र ५० टक्यांनी घटले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीPuneपुणे