प्रा. देशपांडे डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या कुलगुरूपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:21 IST2021-03-04T04:21:02+5:302021-03-04T04:21:02+5:30

पुणे : प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ प्रा. हृदयेश देशपांडे यांची नुकतीच अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे. शिक्षणक्षेत्रात ...

Pvt. Deshpande d. Y. As the Vice Chancellor of Patil University | प्रा. देशपांडे डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या कुलगुरूपदी

प्रा. देशपांडे डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या कुलगुरूपदी

पुणे : प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ प्रा. हृदयेश देशपांडे यांची नुकतीच अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे.

शिक्षणक्षेत्रात २७ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले प्रा. देशपांडे हे इनोव्हेशन, डिझाइन थिंकिंग, संस्था स्थापन, धोरणात्मक नियोजन व शिक्षण व्यवस्थापन अशा विषयात जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहेत. प्रा. देशपांडे हे दूरदर्शी शिक्षणतज्ज्ञ असून त्यांनी शैक्षणिक नवनिर्मिती, शैक्षणिक पुनर्निर्मिती, प्राध्यापक व शैक्षणिक उत्कृष्टता धोरण यासारख्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

त्यांच्या नियुक्तीबद्दल विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील म्हणाले की “प्रा. हृदयेश देशपांडे यांची कुलगुरूपदी नेमणूक करताना मला खूप आनंद होतोय. त्यांचे ज्ञान व अनुभव दांडगा असून त्यांना शिक्षणक्षेत्राची खोलवर समज आहे. त्यांच्या कार्यकाळात विद्यापीठाची उंची नक्कीच वाढेल.”

Web Title: Pvt. Deshpande d. Y. As the Vice Chancellor of Patil University