प्रा. अरुणा वाघेले यांना पीएचडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:30 IST2021-01-08T04:30:36+5:302021-01-08T04:30:36+5:30

पेशवेकालीन प्रांत जुन्नर : एक आर्थिक अभ्यास (१७५९-१८१८) या विषयावरील प्रबंध प्रा. अरुण वाघोले यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ...

Pvt. Aruna Waghele holds a Ph.D. | प्रा. अरुणा वाघेले यांना पीएचडी

प्रा. अरुणा वाघेले यांना पीएचडी

पेशवेकालीन प्रांत जुन्नर : एक आर्थिक अभ्यास (१७५९-१८१८) या विषयावरील प्रबंध प्रा. अरुण वाघोले यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सादर केला होता. डॉ. सुमित्रा कुलकर्णी यांनी त्यांना मार्गदर्शन केले होते . हा प्रबंध पूर्ण करण्यासाठी त्यांना बारा वर्षांचा कालावधी लागला. पेशवे दप्तर भारत इतिहास संशोधक मंडळ येथील मोडी लिपीतील कागदपत्रांचे रूपांतर करून स्वतः मोडी शिकून सदर प्रबंध तयार करून पुणे विद्यापीठात सादर केला होता.

प्रा. अरुणा वाघेले यांचे डॉ. किसन अंबाडे. डॉ. वायदंडे. डॉ रासकर, डॉ. फडतरे, डॉ. मंजुळकर, डॉ. अरुणा मोरे, ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष भाऊ कुऱ्हाडे, उल्हास सहाणे, रोहिदास पाडेकर, बबन सहाणे, माऊली कुऱ्हाडे, प्रसन्ना डोके, प्राचार्य डॉ. सुभाष वाडेकर यांनी अभिनंदन केले.

०४ नारायणगाव अरुणा वाघोले

Web Title: Pvt. Aruna Waghele holds a Ph.D.