राजकारण बाजूला ठेवून मुलीला ताब्यात घेण्यासाठी एकत्र या, हिंदू जनआक्रोश मोर्चामध्ये पडळकरांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 19:20 IST2026-02-18T19:20:28+5:302026-02-18T19:20:50+5:30

संबंधित मुलगी उद्या हजर न झाल्यास पुन्हा २० तारखेला आंदोलनाची दिशा ठरवून आंदोलन केले जाईल

Put politics aside and come together to take custody of the girl, appeals Padalkar in Hindu Jan Aakrosh Morcha | राजकारण बाजूला ठेवून मुलीला ताब्यात घेण्यासाठी एकत्र या, हिंदू जनआक्रोश मोर्चामध्ये पडळकरांचे आवाहन

राजकारण बाजूला ठेवून मुलीला ताब्यात घेण्यासाठी एकत्र या, हिंदू जनआक्रोश मोर्चामध्ये पडळकरांचे आवाहन

भिगवण : मुलीला नराधमांच्या तावडीतून पोलिसांनी तात्काळ हजर करून कुटुंबियांच्या ताब्यात द्यावी हिंदू धर्मातील धर्माच्या मुलींचे संरक्षण झालेच पाहिजे मुलगी ताब्यात आलीच पाहिजे. सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून मुलगी ताब्यात घेण्यासाठी एकत्र आले पाहिजे. असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी भिगवण येथे केले. 

भिगवण येथील तरुणीच्या अपहरणानंतर आरोपीला पोलिसांकडून अटक केली जात नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी भिगवण येथे भाजपा नेते गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू जन आक्रोश मोर्चाची सुरुवात भिगवण बसस्थानक ते भिगवण पोलिस स्टेशन पर्यंत मोर्चा काढून नंतर बसस्थानक परिसरात निषेध व्यक्त करत सभा पार पडली. या मोर्चा मध्ये हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते

यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की, कोणत्याही व्यक्ती हितासाठी ही लढाई नसून अश्या घटना पुन्हा घडू नये यासाठी आपण सतर्क राहिले पाहिजे. या प्रकरणात कोणी दबाव टाकतील कोणतेही व्हिडीओ येतील त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन केले. संबंधित मुलगी उद्या हजर न झाल्यास पुन्हा २० तारखेला आंदोलनाची दिशा ठरवून आंदोलन केले जाईल. यामध्ये माऊली हरनावळ, अमोल काटे,आदींची प्रमुख भाषणे पार पडली. 

Web Title : राजनीति अलग रखकर लड़की को छुड़ाओ: हिंदू जन आक्रोश मोर्चा में पडळकर का आह्वान

Web Summary : गोपीचंद पडळकर ने लड़की को छुड़ाने के लिए राजनीति से ऊपर उठकर एकजुट होने का आह्वान किया। भाजपा नेताओं के नेतृत्व में भिगवन में पुलिस की निष्क्रियता के खिलाफ हिंदू जन आक्रोश मोर्चा निकाला गया। संग्राम जगताप ने गलत सूचना के प्रति आगाह किया; लड़की न मिलने पर और विरोध प्रदर्शन की धमकी दी।

Web Title : Unite to Recover Girl: Padalkar's Call at Hindu Jan Akrosh Morcha

Web Summary : Gopichand Padalkar urged unity, setting aside politics, to recover a girl. A Hindu Jan Akrosh Morcha, led by BJP leaders, protested police inaction in Bhigwan. Sangram Jagtap warned against misinformation; further protests threatened if the girl isn't found.