पुरुषोत्तमवर ‘काही प्रॉब्लेम ये का?’ एकांकिकेची मोहोर; जयराम हर्डीकर स्मृतिचिन्हासाठी एकही एकांकिका पात्र नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 12:15 IST2025-09-15T12:15:05+5:302025-09-15T12:15:41+5:30

सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी असलेल्या जयराम हर्डीकर स्मृतिचिन्हासाठी या वर्षी एकही एकांकिका पात्र ठरलेली नाही

Purushottam karandak one-act play 'Kahi Problem Ye Ka?' is a hit; No one-act play is eligible for the Jairam Hardikar memorial | पुरुषोत्तमवर ‘काही प्रॉब्लेम ये का?’ एकांकिकेची मोहोर; जयराम हर्डीकर स्मृतिचिन्हासाठी एकही एकांकिका पात्र नाही

पुरुषोत्तमवर ‘काही प्रॉब्लेम ये का?’ एकांकिकेची मोहोर; जयराम हर्डीकर स्मृतिचिन्हासाठी एकही एकांकिका पात्र नाही

पुणे: पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत हडपसरच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘काही प्रॉब्लेम ये का?’ एकांकिकेने बाजी मारली आणि करंडकावर आपले नाव कोरले. मात्र, सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी असलेल्या जयराम हर्डीकर स्मृतिचिन्हासाठी या वर्षी एकही एकांकिका पात्र ठरलेली नाही. सांघिक द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक हरी विनायक करंडक वामन आख्यान (मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड) एकांकिकेने पटकावले तर तृतीय पारितोषिक संजीव करंडक ‘आतल्या गाठी’ (सर परशुरामभाऊ महाविद्यालय) या एकांकिकेला जाहीर करण्यात आले.

महाराष्ट्रीय कलोपासकच्या वतीने भरत नाट्य मंदिर येथे शनिवार आणि रविवारी हीरकमहोत्सवी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी आयोजित करण्यात आली होती. प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीत पोहोचलेल्या नऊ संघांचे तीन सत्रांत सादरीकरण झाले. स्पर्धेचा निकाल रविवारी रात्री जाहीर करण्यात आला. स्पर्धेसाठी योगेश सोमण, अश्विनी गिरी, प्रदीप वैद्य यांनी परीक्षण केले.

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचा सविस्तर निकाल 

* सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका : पारितोषिक दिलेले नाही
*सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखक : अथर्व किरवे, क्षितिज दीक्षित (कोयता, पुणे विद्यार्थिगृहाचे अभियांत्रिकी महाविद्यालय).

*सर्वोत्कृष्ट विद्यार्थी प्रायोगिक लेखक : सोहम कुलकर्णी, इश्वरी जोशी (हॅपी बर्थडे कप केक, फर्ग्युसन महाविद्यालय, स्वायत्त).
*उत्तेजनार्थ विद्यार्थी लेखिका : अपूर्वा काळपुंड (पिसाळा, न्यू आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेज).

*सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : आस्था काळे (काही प्राब्लॅम ये का? अण्णासाहेब मगर कॉलेज, हडपसर).
*उत्तेजनार्थ दिग्दर्शन : (अंतिम फेरी) : अनिकेत खरात, विराज दिघे (वामन आख्यान, मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड).

*उत्तेजनार्थ दिग्दर्शन : (अंतिम फेरी) : अद्वय पूरकर, शाश्वती वझे, समर्थ खळदकर (आतल्या गाठी, सर परशुराम भाऊ महाविद्यालय).
*सर्वोत्कृष्ट वैयक्तिक अभिनय नैपुण्य : पारितोषिक दिलेले नाही.

*अभिनय नैपुण्य (अभिनेता) : ओमकार कापसे (प्रतीक, काही प्रॉब्लेम ये का? अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर).
*अभिनय नैपुण्य (अभिनेत्री) : शाश्वती वझे (जुई, आतल्या गाठी, सर परशुरामभाऊ महाविद्यालय).

*वाचिक अभिनय नैपुण्य : तृप्ती येवले (म्हातारी, रामरक्षा, आयएमसीसी).
*अभिनय उत्तेजनार्थ (अंतिम फेरी) : विद्यार्थी, भूमिका, एकांकिका महाविद्यालय या क्रमाने.

*अद्वय पूरकर (आतल्या गाठी, सर परशुरामभाऊ महाविद्यालय).
*शर्व कुलकर्णी (अनिरुद्ध, पावसात आला कोणी, मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय).

*आयुष वाघ (महादेव, रामरक्षा, आयएमसीसी).
*क्षितिज दीक्षित (अमोल दरड, कोयता, पुणे विद्यार्थिगृहाचे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय).

*मित कुलकर्णी (सावळा कुंभार, यथा प्रजा तथा राजा, म. ए. सो. सिनिअर कॉलेज).
*स्नेहल पाटे (गंगी, यथा प्रजा तथा राजा, म. ए. सो. सिनिअर कॉलेज).

*आस्था काळे (दृष्टी, काही प्रॉब्लेम ये का? अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर).
*समीक्षा काळे (बहीण, काही प्रॉब्लेम ये का? अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर).

*गौरी देशपांडे (गौरी, रामरक्षा, आयएमसीसी).
*केतकी भालवणकर (सरिता, वामन आख्यान, मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड).

*सर्वोत्कृष्ट आयोजित संघ : पुणे विद्यार्थिगृहाचे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय (कोयता).

Web Title: Purushottam karandak one-act play 'Kahi Problem Ye Ka?' is a hit; No one-act play is eligible for the Jairam Hardikar memorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.