शहरं
Join us  
Trending Stories
1
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
4
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
5
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
6
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
7
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
9
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
10
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
11
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
12
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
13
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
14
अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नाही, हा आमचा झांगनान; चीनची दर्पोक्ती, भारतावर निशाणा
15
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
16
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
17
१८८९ ते १९४९ - राज्यघटनेच्या जन्माची ६० वर्षे! 'असा' भारतीय घटनेच्या निर्मितीचा इतिहास
18
‘काँग्रेस’चे शशी थरूर भाजपमध्ये (कधी) जातील?; केरळच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतील
19
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
20
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
Daily Top 2Weekly Top 5

Purandar Airport : प्रस्तावित विमानतळ परिसरातील मागील पाच वर्षांतील व्यवहारांची होणार तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 09:51 IST

प्रस्तावित विमानतळ परिसरातील मागील पाच वर्षांतील सर्व जमीन व्यवहारांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली

पुणे :पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे परिसरातील जमिनींना सोन्याचे दर मिळू लागले आहेत. मात्र, या संधीचा फायदा घेत काही जणांनी बनावट कागदपत्रे तयार करून जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रस्तावित विमानतळ परिसरातील मागील पाच वर्षांतील सर्व जमीन व्यवहारांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी, उदाचीवाडी आणि वनपुरी या सात गावांच्या सुमारे तीन हजार एकर जमिनीवर विमानतळ उभारण्यात येणार आहे. सध्या या जमिनींची मोजणी सुरू असून, ती १७ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. बनावट दस्तऐवजांच्या आधारे जमिनींची खरेदी-विक्री झाल्याने एका प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच अशा प्रकारच्या तीन तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या असून, आणखी काही प्रकरणे आहेत का, याचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणामध्ये काही महसूल अधिकाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हाधिकारी डुडी यांनी या बाबीची गंभीर दखल घेतली असून, कोणालाही सोडले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

विमानतळाची घोषणा होताच काहींनी बनावट कागदपत्रे तयार करून जमिनी खरेदी-विक्रीचे व्यवहार केले आणि सातबारा उताऱ्यावरही त्याची नोंद करण्यात आली. शेतकऱ्यांच्या नावावर असलेल्या जमिनी अन्य व्यक्तींना विकल्या गेल्या असून, त्यांच्या नावाने खोटे आधारकार्ड तयार करून सातबारा नोंदी बदलण्यात आल्याचेही समोर आले आहे. सध्या अशा तीन प्रकरणांवर तपास सुरू असून, आणखी काही प्रकरणे उघड होण्याची शक्यता आहे.

खोटी कागदपत्रे सादर करून जमीन खरेदी-विक्रीची तीन प्रकरणे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आली आहेत. अशा प्रकारच्या अनेक व्यवहारांची शक्यता आहे. पोलिसांमार्फत याची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांची फसवणूक झालेली प्रकरणे आम्ही सुधारू. सातबारा उताऱ्यांतील चुकीच्या नोंदी दुरुस्त करून मूळ शेतकऱ्यांच्या नावे परत नोंद केली जाईल.  - जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी

English
हिंदी सारांश
Web Title : Purandar Airport: Land deal probe initiated over past five years.

Web Summary : Purandar airport land deals face scrutiny due to fraudulent transactions. District Collector Dudi ordered investigation into past five years' deals, vowing strict action against culprits. Fake documents were used to transfer land; some revenue officers may be involved. False records on ownership are being corrected.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रAirportविमानतळPurandarपुरंदरpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड