राजेंद्र पवार यांना पंजाबराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:09 AM2021-04-02T04:09:59+5:302021-04-02T04:09:59+5:30

बारामती : येथील अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांना २०१९ चा राज्य शासनाचा पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार जाहीर ...

Punjabrao to Rajendra Pawar | राजेंद्र पवार यांना पंजाबराव

राजेंद्र पवार यांना पंजाबराव

Next

बारामती : येथील अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांना २०१९ चा राज्य शासनाचा पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच बारामती तालुक्यातील कांबळेश्वरच्या आशा शिवाजी खलाटे यांना देखील जिजामाता कृषिभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. बारामतीला कृषिक्षेत्रातील राज्यस्तरीय दोन पुरस्कार मिळाल्याने दुहेरी आनंद झाला आहे.

दोन वर्षांतील पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, सेंद्रिय शेती कृषिभूषण पुरस्कार, वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यान पंडित, डॉक्टर पद्मश्री विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार व राज्यस्तरीय पीक स्पर्धा पुरस्कार असे विविध पुरस्कार जाहीर केले आहेत. राजेंद्र पवार यांनी कृषिक्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. बारामतीतील पवार घराणे फक्त राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. मात्र राजेंद्र पवार यांनी जाणीवपूर्वक स्वत:ला राजकारणापासून दूर ठेवत. कृषिक्षेत्रामध्ये झोकून देऊन काम केले आहे. बारामती येथील अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी शेतीमध्ये नवतंत्रज्ञानाची भर घालत शेतक-यांना आधुनिक शेतीची गोडी लावली. या संस्थेच्या माध्यमातून शेतक-यांसाठी नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवत शेतक-यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याचा देखील प्रयत्न सातत्याने केला जात आहे. कृषि विज्ञान केंद्र बारामती, अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थाच्या माध्यमातून राजेंद्र पवार देशभरातील शेतकऱ्यांशी जोडले गेले आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेत राज्य शासनाच्या वतीने २०१९ चा पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

राजेंद्र पवार

०१०४२०२१-बारामती-०१

Web Title: Punjabrao to Rajendra Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.