शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबी-मराठीचे नाते साहित्य संमेलनामुळे दृढ

By admin | Updated: May 21, 2015 01:49 IST

मुघलांच्या संरक्षणाबरोबर पंजाब व इतर राज्यांच्या संरक्षणाची जबाबदारी मराठ्यांनी निभावली. पंजाब वाचविण्यासाठी मराठे पानिपताच्या लढाईत प्राणपणाने लढले.

पुणे : मुघलांच्या संरक्षणाबरोबर पंजाब व इतर राज्यांच्या संरक्षणाची जबाबदारी मराठ्यांनी निभावली. पंजाब वाचविण्यासाठी मराठे पानिपताच्या लढाईत प्राणपणाने लढले. हे पंजाबी आणि मराठी माणसाचे नाते आहे. घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने हे नाते अधिक दृढ झाले, असा आशावाद वसंत व्याख्यानमालेतील परिसंवादात बुधवारी प्रकट झाला. वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे टिळक स्मारक मंदिरात आयोजित वसंत व्याख्यानमालेत भाऊसाहेब मोडक स्मृती व्याख्यानात ‘साहित्य संमेलनाच्या निमित्ताने’ या विषयावरील परिसंवादाने मालेच्या १४१व्या ज्ञानसत्राचा बुधवारी समारोप झाला. घुमान येथील ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी परिसंवादात सहभाग घेतला. वक्तृत्वोत्तेजक सभेचे उपाध्यक्ष सुरेश पिंगळे उपस्थित होते. सभेचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक अध्यक्षस्थानी होते.डॉ. मोरे यांनी महाराष्ट्र व पंजाबच्या ऐतिहासिक नात्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, स्थानिक भाषांचा वापर वाढल्यानंतर दुसऱ्या प्रांतात जाऊन तेथे संस्कृती, भाषा रुजविणारे संत नामदेव हे पहिले भारतीय होत. डॉ. वैद्य म्हणाल्या, ‘‘गेल्या १३ वर्षांत बृहन्महाराष्ट्रात संमेलन झाले नव्हते. घुमानच्या संमेलन खऱ्या अर्थाने अखिल भारतीय ठरले. मराठी भाषा इतर भाषांशी जोडण्याची वेळ आली आहे. पायगुडे म्हणाले, साहित्य संमेलन हा भाषेचा आणि शब्दांचा उत्सव आहे. उत्सवीकरण झाले तरी हरकत नाही; पण दर्जा सांभाळत हा उत्सव झालाच पाहिजे. दरम्यान व्याख्यानमालेतील ज्येष्ठ कार्यकर्ते विजय बारभाई यांच्यासह चिन्मय अत्रे, अभिषेक घैसास, नेहा देसाई व मंदार कारंजकर या तरुण कार्यकर्त्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. मंदार बेडेकर यांनी केले. (प्रतिनिधी)अध्यक्ष होणे हा क्लायमॅक्स४घुमान येथील संमेलनाचे अध्यक्ष होणे हा माझ्या आयुष्यातील ‘क्लायमॅक्स’ आहे, असे वर्णन डॉ. सदानंद मोरे यांनी केले. वसंत व्याख्यानमालेत संमेलनावर भाषण देणे हीच संमेलनाची फलश्रुती आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.४ज्येष्ठांसह तरुण कार्यकर्त्यांचा करण्यात आला सत्कार.