शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
4
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
5
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
6
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
7
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
8
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
9
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
10
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
11
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
12
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
13
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
14
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
15
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
16
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
17
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
18
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
19
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
20
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याला ‘स्वाइन’चा विळखा

By admin | Updated: August 22, 2015 02:20 IST

तीन महिन्यांपासून गायब झालेल्या स्वाइन फ्लूने शहरात पुन्हा डोके वर काढले असून, हा विळखा वेगाने घट्ट होऊ लागला आहे. या महिन्याच्या अवघ्या

पुणे : तीन महिन्यांपासून गायब झालेल्या स्वाइन फ्लूने शहरात पुन्हा डोके वर काढले असून, हा विळखा वेगाने घट्ट होऊ लागला आहे. या महिन्याच्या अवघ्या २० दिवसांत स्वाइन फ्लूची लागण झालेले तब्बल ४० रुग्ण सापडले असून, त्यांपैकी ७ जणांचा मृत्यू झाला आहे. उपचाराला उशीर होत असल्याने रुग्णांची प्रकृती चिंताजनक होण्याचे प्रमाण पुण्यात राज्यामध्ये सर्वाधिक आहे. सध्या पुण्यात १३ रुग्ण कृत्रिम श्वासोच्छ्वासावर आहेत.या वर्षाच्या सुरुवातीला अचाकन पुण्यात डोके वर काढलेल्या स्वाइन फ्लूने काही दिवसांत पूर्ण शहराला विळख्यात घेतले. जानेवारी ते एप्रिल या ४ महिन्यांत स्वाइन फ्लू पुण्यात थैमान माजविण्यास सुरुवात केली. हा काळ थंडीचा असल्याने स्वाइन फ्लूच्या ‘एच १ एन १’ या विषाणूंसाठी पोषक वातावरण होते. मात्र, मे महिन्यात वेगाने वाढलेल्या तापमानामुळे स्वाइन फ्लूच्या विषाणूंना अनुकूल स्थिती राहिली नाही. त्यामुळे हा आजार वेगाने कमी झाला होता. मात्र, आता पावसाळ्याचा हंगाम सुरू झाल्याने पुण्यात पुन्हा स्वाइन फ्लूच्या विषाणूंना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांवर हे विषाणू हल्ला करीत आहेत. त्यामुळे स्वाइन फ्लूची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे.या महिन्यात दि. १ ते २० आॅगस्ट तब्बल ४० जणांना या आजाराची लागण झाली व त्यांपैकी ७ जणांचा या आजाराने बळी घेतला आहे.