शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

पुणेकरांनो ऑनलाईन फसवणुक झाल्यास तातडीने संपर्क साधा; पोलिसांकडून २ मोबाईल नंबर जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 10:51 IST

अपघात किंवा ऑनलाईन फसवणुकीचा व्हॉट्सअप मोबाईल नं. ७०५८७१९३७१/७०५८७१९३७५ वर संपर्क साधा

ठळक मुद्देशहरातील नागरिकांची ऑनलाईन फसवणूक झाल्यास त्यांनी तात्काळ या मोबाईल नंबरवर संपर्क साधून त्यांच्या सोबत फसवणूकीचा झालेला प्रकार सांगावा.

पुणे: अपघातात एखादा जखमी झाला तर त्याला तातडीने मदत केल्यास त्याचे प्राण वाचू शकतात. पहिल्या एक तासाला गोल्डन अवर म्हटले जाते. त्याचप्रमाणे ऑनलाईन शॉपिंग, पेमेन्ट करताना फसवणूक झाल्यास नागरिकांनी तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा. त्याठी दोन व्हॉटसअप मोबाईल नंबर जाहीर करण्यात आले आहेत. या क्रमांकावर फसवणूक झालेल्यांनी संपर्क साधल्यास तातडीने कारवाई करणे शक्य होणार आहे.

सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे ऑनलाईन व्यवहारात फसवणूक करुन पैसे काढून घेतले जातात. नागरिकांना तात्काळ कोठे तक्रार करायची याची पूर्ण माहिती नसते. त्यामुळे नागरिकांना सायबर पोलिसांपर्यंत पोहोचण्यास विलंब झाल्याने सायबर चोरटे तातडीने पैसे त्यांच्या बँक खात्यातून/वॉलेटमधून काढून घेतो. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्यांचे टि्वटर अकाऊंटद्वारे जनजागृती मोहिम सुरु केली आहे. त्यांनी हे ७०५८७१९३७१/७०५८७१९३७५ दोन व्हॉटसअप मोबाईल नंबर जाहीर केले आहेत.

पोलिसांना अशा प्रकारे सांगावी फसवणूक झाल्याची माहिती 

पुणे शहरातील नागरिकांची ऑनलाईन फसवणूक झाल्यास त्यांनी तात्काळ या मोबाईल नंबरवर संपर्क साधून त्यांच्या सोबत फसवणूकीचा झालेला प्रकार सांगावा. त्यानंतर सायबर पोलीस त्या फसवणूकीच्या व्यवहाराची कोणती माहिती पोलिसांना पुरवायची ते सांगतील. त्यानंतर ते व्यवहार थांबवण्यासाठी झालेल्या फसवणूकीच्या क्रमांक व लिंक स्क्रीनशॉट्स, डेबिटबाबत प्राप्त झालेले मेसेजेस, बँकेचे नाव, खाते क्रमांक, डेबीट कार्ड/ क्रेडीट कार्ड क्रमांक व लिंक मोबाईल नंबर इत्यादी माहिती सायबर पोलिसांच्या व्हॉटसअप क्रमांकावर पुरवावेत. त्यानंतर सायबर पोलीस फसवणूकीत त्यांचे खात्यातून वळती झालेली रक्कम देशभरातील संबंधित बँक/ वॉलेटमध्ये गोठवून ठेवण्यासाठी कळवितात. त्यामुळे नागरिकांचे झालेल्या फसवणूकीतील व्यवहारातील पैसे परत मिळवता येतात.

नागरिकांनी कोणाचेही सांगण्यावरुन मोबाईल क्लोन ॲप डाऊनलोड करु नये. कोणत्याही अनाधिकृत लिंक ओपन किंवा शेअर करु नये. मोबाईलवर आलेला ओटीपी, क्रेडिट, डेबीट कार्डची माहिती शेअर करु नये. तसेच ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ वरील क्रमांकावर संपर्क साधावा. संबंधित बँकेचे अधिकृत हेल्पलाईन खात्रीशीर माहिती असल्याशिवाय माहिती देऊ नये. गुगलसारख्या सर्च इंजिनवरील कस्टमर केअरचा क्रमांकावर माहिती देऊ नये. तो क्रमांक चोरट्याने रजिस्टर केलेला असून शकतो, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसfraudधोकेबाजीonlineऑनलाइनSocialसामाजिकCrime Newsगुन्हेगारी