शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

पुणेकरांची पसंती सार्वजनिक वाहनांनाच अधिक : खासगी वाहनांपेक्षा कॅब, टॅक्सी अथवा ऑटो रिक्षाने प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 12:19 PM

गेल्या दहा वर्षात वाहनांची संख्या दुपटीने वाढली आहे...

ठळक मुद्देखासगी वाहने घटली तर सार्वजनिक वाहनांची संख्या वाढलीवाहनांच्या संख्येत २८ हजारांची घट

पुणे : एकीकडे शहरातील अरुंद रस्ते आणि दुसरीकडे दिवसागणिक वाहनांच्या संख्येत पडत चाललेली भर असे चित्र गेल्या वर्षापर्यंत दिसत होते. मात्र, यावर्षी मार्च २०१९ पर्यंत आरटीओकडे झालेल्या वाहनांच्या नोंदीमध्ये तब्बल २८ हजार ५०० ने घट झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये खासगी वाहनांची संख्या घटली असून सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुणेकरांकडून खासगी वाहनांपेक्षा कॅब, टॅक्सी अथवा ऑटो रिक्षाने प्रवास करण्याला अधिक पसंती देण्यात येत असल्याचे दिसू लागले आहे.  महापालिकेच्या पर्यावरण अहवालामध्ये ही माहिती नमूद करण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षात वाहनांची संख्या दुपटीने वाढली आहे. २००९ साली १७ लाख ६० हजार ४०२ वाहनांची नोंद झाली होती. तर २०१८ सालापर्यंत वाहनांची संख्या ३६ लाख २७ हजार २८० झाली. यामध्ये वाढ होऊन २०१९ साली ही संख्या ३८ लाख ८८ हजार ६९० वर पोचली आहे. शहरामध्ये वषार्काठी नोंद होणाºया वाहनांची संख्या वाढतच गेली आहे. गेल्या वर्षी २ लाख ८९ हजार ९१० नवीन वाहनांची नोंदणी झाली होती. तर २०१९ मध्ये २ लाख ६१ हजार ४१० इतक्या नवीन वाहनांची नोंद झाली असून नवीन वाहनांच्या नोंदणीमध्ये घट झालेली आहे. पर्यावरण अहवालामध्ये नमूद केल्याप्रमाणे २०१२ पासून २०१९ पर्यंतच्या कालावधीत पहिल्यांदाच नोंदणीमध्ये ही घट झाल्याचे दिसत आहे. खासगी आणि सार्वजनिक वाहने अशी नोंदणी आरटीओकडे करण्यात येते. खासगी वाहनांमध्ये चालू २०१९ मध्ये १ लाख ७६ हजार ३१४ नवीन दुचाकींची झालेली नोंदणी ही गेल्या वर्षीच्या नोंदणीपेक्षा कमी आहे. गेल्या वर्षी २ लाख ५ हजार ८०४ दुचाकींची नोंद झाली होती. तर २०१९ मध्ये ४७ हजार ६१७ नवीन मोटारींची नोंदणी झाली असून ही नोंदणी मागील वषीर्पेक्षा जवळपास एक हजारांनी कमी झाली आहे. ====सार्वजनिक वाहनांची नोंद होण्याचे प्रमाण वाढले आहे. चालू वर्षात १ लाख २३ हजार ४६ नवीन सार्वजनिक वाहनांची नोंद झाली आहे. २०१८ मध्ये ही ९९ हजार १९ सार्वजनिक वाहनांची नोंद झाली होती. २०१६ पासून टॅक्सी, कॅब्सची संख्या वाढत चालली आहे. २०१६ साली या वाहनांची संख्या १० हजार ७६ होती. ही संख्या चालू वर्षात ३५ हजार ७६ झाली असून जवळपास साडेतीन पटींनी ही वाढ झाली आहे. ====आरटीओने २०१७ पासून रिक्षा परमीट खुले केल्याने रिक्षांच्या संख्येमध्ये लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. २०१७ सालात एकूण रिक्षांची संख्या ४५ हजार ४ होती. तर २०१८ मध्ये ५३ हजार २२७ इतकी होती. चालू वर्षात ही संख्या ६९ हजार २७१ वर गेली आहे. 

टॅग्स :PuneपुणेRto officeआरटीओ ऑफीसtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलरTrafficवाहतूक कोंडी