ऑनलाइन वीजबिल भरण्यात पुणेकर आघाडीवर; एकाच महिन्यात ५६५ कोटींचा भरणा

By नितीन चौधरी | Published: June 6, 2023 01:26 PM2023-06-06T13:26:23+5:302023-06-06T13:26:37+5:30

दरमहा सरासरी १ लाख ५६ हजार ३३० वीज ग्राहकांची गेल्या ५ महिन्यांमध्ये वाढ झाली

Punekar at the forefront in online electricity bill payment; 565 crores paid in a single month | ऑनलाइन वीजबिल भरण्यात पुणेकर आघाडीवर; एकाच महिन्यात ५६५ कोटींचा भरणा

ऑनलाइन वीजबिल भरण्यात पुणेकर आघाडीवर; एकाच महिन्यात ५६५ कोटींचा भरणा

googlenewsNext

पुणे: महावितरणच्यापुणे परिमंडलात मेमध्ये घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिकसह इतर २० लाख १५ हजार लघुदाब वीज ग्राहकांनी ५६४ कोटी ९९ लाख रुपयांचा ‘ऑनलाइन’द्वारे भरणा केला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांच्या सरासरीपेक्षा ही संख्या दीड लाखाने जास्त आहे. ऑनलाइन भरणा करण्यात पुणेकर राज्यात आघाडीवर आहेत.

पुणे परिमंडलामध्ये एप्रिल ते सप्टेंबर २०२२ पर्यंत लघुदाब वर्गवारीतील सरासरी १७ लाख ४१ हजार ८६० वीज ग्राहक दरमहा ऑनलाइन वीजबिल भरणा करीत होते. ही संख्या ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ पर्यंत १८ लाख ६४ हजार ८२० वर गेली. त्यानंतर जानेवारी ते मे २०२३ पर्यंत सरासरी दरमहा ग्राहकांची संख्या २० लाख २१ हजार १३० वर गेली आहे. ऑनलाइन बिल भरण्यास पुणे परिमंडलामध्ये वीज ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि दरमहा सरासरी १ लाख ५६ हजार ३३० वीज ग्राहकांची गेल्या ५ महिन्यांमध्ये वाढ झाली आहे.

मेमध्ये पुणे शहरातील ११ लाख ३० हजार २२५ लघुदाब घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीज ग्राहकांनी ३१२ कोटी ८७ लाख रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाइन भरणा केला आहे. यामध्ये महावितरणच्या बंडगार्डन विभागातील सर्वाधिक १ लाख ९१ हजार ९१३ ग्राहकांचा समावेश आहे. उर्वरित शिवाजीनगर, कोथरूड, नगररोड, पद्मावती, पर्वती व रास्तापेठ विभागांमध्ये सरासरी १ लाख ५६ हजार ३८५ वीज ग्राहकांनी ऑनलाइन वीजबिल भरण्यास पसंती दिली आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये लघुदाब ५ लाख २८ हजार ६४ ग्राहकांनी १४९ कोटी १० लाखांच्या वीजबिलांचा ऑनलाइन भरणा केला आहे. पुणे परिमंडलामध्ये ऑनलाइन वीजबिल भरण्यात पिंपरी चिंचवड शहर आघाडीवर आहे. गेल्या महिन्यात या शहराअंतर्गत पिंपरी विभागातील ३ लाख ८ हजार ११६, तर भोसरी विभागातील २ लाख १९ हजार ९४८ ग्राहकांनी ऑनलाइन भरणा केला आहे. पुणे ग्रामीणमध्ये गेल्या महिन्यात आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व हवेली तालुक्यातील ३ लाख ५६ हजार ९४५ ग्राहकांनी १०३ कोटी २ लाख रुपयांचा भरणा केला आहे.

Web Title: Punekar at the forefront in online electricity bill payment; 565 crores paid in a single month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.