उपाध्यक्षपदासाठी शेवटच्या क्षणी ‘ट्विस्ट’; वळसे-पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 14:02 IST2026-03-19T14:01:17+5:302026-03-19T14:02:00+5:30

जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची निवड करण्याचे सर्वाधिकार सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आले होते.

pune zp Last-minute twist for the post of Vice President; Walse-Patil's name confirmed | उपाध्यक्षपदासाठी शेवटच्या क्षणी ‘ट्विस्ट’; वळसे-पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब

उपाध्यक्षपदासाठी शेवटच्या क्षणी ‘ट्विस्ट’; वळसे-पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब

पुणे - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वीरधवल जगदाळे यांचे नाव आधीच निश्चित झाले असताना उपाध्यक्षपदावर मात्र शेवटच्या क्षणापर्यंत तणाव कायम होता. अखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीनंतर विवेक वळसे-पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची निवड करण्याचे सर्वाधिकार सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आले होते. अध्यक्षपदासाठी जगदाळे यांचे नाव दोन दिवसांपूर्वीच निश्चित झाले होते. मात्र, उपाध्यक्षपदासाठी सकाळी दहा-साडेदहापर्यंतही स्पष्टता नव्हती.

या पदासाठी मुंबईतही राजकीय खलबते सुरू होती. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील आणि पार्थ पवार यांच्यात देवगिरी बंगल्यावर चर्चा झाली. काही काळ अंकिता पाटील यांच्या नावाचीही चर्चा रंगली होती तसेच शांताराम इंगवले आणि विष्णू हिंगे यांची नावेही आघाडीवर होती.

दरम्यान, पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा ठेवण्याचा निर्णय झाल्यानंतर समीकरणे बदलली आणि अखेर विवेक वळसे-पाटील यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाले.इंदापूर आणि बारामतीतील राजकीय गणितांचाही या निवडीत परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. पार्थ पवार यांनी जगदाळे यांच्या नावावर आधीच सहमती दर्शवली होती. मात्र, उपाध्यक्षपदासाठी शेवटच्या क्षणी बदल झाले. दरम्यान, दोन आठवड्यांनंतर चार सभापती पदांसाठी निवड होणार असून, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गणिते पुन्हा बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title : उपाध्यक्ष चुनाव में ट्विस्ट; अंतिम समय पर वलसे-पाटिल के नाम पर मुहर

Web Summary : विवेक वलसे-पाटिल ने देर रात चर्चा के बाद पुणे जिला परिषद के उपाध्यक्ष पद को सुरक्षित किया। सुनेत्रा पवार के पास चयन का अधिकार था। जगदाले का नाम अध्यक्ष के लिए तय था, लेकिन उपाध्यक्ष पद अनिश्चित रहा। आंतरिक राजनीति और रणनीतिक गणनाओं ने अंतिम निर्णय को प्रभावित किया।

Web Title : Twist in Deputy Chairman Election; Valse-Patil Finalized at Last Moment

Web Summary : Vivek Valse-Patil secured the Pune Zilla Parishad Deputy Chairman post after late-night discussions. Sunetra Pawar held the authority for selections. While Jagdale's name was set for Chairman, the deputy position remained uncertain. Internal politics and strategic calculations influenced the final decision.