पुणे : पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांसाठी झालेल्या मतदानाच्या निकालाला आज सकाळापासून सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी २९९ उमेदवार, तर पंचायत समित्यांच्या १४६ गणांसाठी ५२८ उमेदवार रिंगणात होते. यंदा सर्वाधिक मतदान राजगड तालुक्यात ७९.३० टक्के, तर सर्वात कमी बारामती तालुक्यात ५४.९० टक्के झाले. आता समोर आलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारत २४ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर भाजप १५ शिवसेना ३ ठाकरे सेना आणि काँग्रेस एक जागेवर आघाडीवर आहे.
१३ पंचायत समितीमध्ये पुरंदरमध्ये राष्ट्रवादीने खाते उघडले असून दिवे --गराडे गटातून विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीच्या रूपाली झेंडे, अर्चना कटके, अमित झेंडे हे विजयी झाले आहेत. मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जुने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आपला गड राखणार की विरोधक सत्तांतर घडवणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत एकूण मतदानांपैकी १० लाख ७६ हजार ५९८ पुरुष मतदारांनी मतदान केले, तर ९ लाख ५८ हजार १४४ महिला मतदारांनी मतदान केले. २०१७ मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये बारामती तालुक्यात ७१.३५ टक्के मतदान झाले होते. यंदा मात्र मतदानाच्या टक्केवारीत तब्बल १६.४५ टक्के इतकी घट झाली आहे.
तालुकानिहाय मतदानाची आकडेवारी (अंदाजे)
जुन्नर – ६१.१८आंबेगाव – ६५.३०शिरूर – ७५.५९खेड – ७५.४६मावळ – ७७.४३मुळशी – ६३.७९हवेली – ६८.०२दौंड – ६५.००पुरंदर – ६८.३७राजगड (वेल्हा) – ७९.३०भोर – ७५.६२बारामती – ५४.९०इंदापूर – ६५.६७
Web Summary : In Pune ZP elections, NCP leads with 24 seats. Purandar sees NCP victory. Rajgad recorded highest voter turnout. Baramati had the lowest. Focus is on who will control the government after Pawar.
Web Summary : पुणे ZP चुनाव में NCP 24 सीटों के साथ आगे। पुरंदर में NCP की जीत। राजगढ़ में सबसे अधिक मतदान हुआ। बारामती में सबसे कम। पवार के बाद सरकार पर नियंत्रण किसका होगा, इस पर ध्यान केंद्रित है।