Pune ZP Election Result 2026: पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला पक्षाला भोपळा की मिळाल्या जागा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 11:58 IST2026-02-09T11:57:25+5:302026-02-09T11:58:25+5:30
सुरुवातीच्या फेऱ्यांतील आकडेवारीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली असून भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Pune ZP Election Result 2026: पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला पक्षाला भोपळा की मिळाल्या जागा?
पुणे :पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांसाठी पार पडलेल्या निवडणुकांमध्ये तब्बल ६८.३५ टक्के मतदान झाले होते. सोमवारी सकाळपासून सुरू झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील राजकीय चित्र हळूहळू स्पष्ट होत असून अनेक पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे.
सुरुवातीच्या फेऱ्यांतील आकडेवारीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली असून भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाच्या शिवसेनेने खाते उघडत आपली उपस्थिती दाखवून दिली आहे. मात्र काँग्रेस पक्षाला अद्याप एकही जागा मिळाली नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे.
या निकालामुळे पुणे जिल्ह्यातील पारंपरिक राजकीय गणितांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणावरही या निकालांचा परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
आतापर्यंतची पक्षनिहाय स्थिती :
जिल्हा परिषद एकुण जागा - ७३ पैकी ६९ जागा निकाल
भाजप --१०
शिवसेना -- ४
राष्ट्रवादी -- ४८
शरद पवार गट -- १
ठाकरे गट -- ६
काँग्रेस -- ०
अपक्ष -- ०
मतमोजणीच्या पुढील फेऱ्यांकडे सर्वांचे लक्ष लागले असून अंतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर जिल्ह्याच्या सत्तासमीकरणांवर शिक्कामोर्तब होणार आहे.