पिंपरी - जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2026 च्या मतमोजणीत मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) एकतर्फी वर्चस्व सिद्ध केले आहे. मावळमधील पाचही जिल्हा परिषद आणि दहाही पंचायत समितीच्या जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विजय मिळवत भाजपला मोठा धक्का दिला. अनेक जागा थेट भाजपकडून खेचून आणत राष्ट्रवादीने ‘अख्खा मावळ आपलाच’ असा संदेश दिला आहे.यंदा तब्बल ६८.३५ टक्के मतदान झाल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी आघाडीवर असून अंतिम निकालांनीही हे स्पष्ट झाले आहे. मावळ पंचायत समितीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून स्थानिक राजकारणात पक्षाची पकड अधिक घट्ट झाल्याचे चित्र आहे.पंचायत समितीनिहाय निकाल (मावळ तालुका)टाकवे बुद्रुक – प्राची गायकवाड यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला.नाणे – आशा मोरमारे यांचा स्पष्ट विजय.वराळे – राजेंद्र कडलक यांनी बाजी मारली.इंदुरी – दिलीप ढोरे विजयी.खडकाळे – समीर जाधव यांनी विजय मिळवला.कार्ला – रेश्मा देवकर यांचा अटीतटीचा पण निर्णायक विजय.कुसगाव बुद्रुक – योगेश लोहर विजयी.काले – शैला कालेकर यांनी आघाडी राखली.सोमाटणे – साहेबराव कारके विजयी.चांदखेड – सुनिता येवले यांनी विजय मिळवला.-------- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 (मावळ तालुका)मतमोजणी अंतिम निकाल (पंचायत समिती)टाकवे बुद्रुक पं.स.अश्विनी कोंडे - 3757प्राची गायकवाड - 11681प्राजक्ता शिंदे - 162नोटा - 171नाणे पं.स.संगिता आढारी - 3500आशा मोरमारे - 10057चैताली मोरमारे - 208नोटा - 302वराळे पं.स.राजेंद्र कडलक - 9656रवि शेटे - 6420नोटा - 181इंदुरी पं.स.दिलीप ढोरे - 7073श्रीकृष्ण भेगडे - 5775अजय केदारी - 52नोटा - 100खडकाळे पं.स.प्रकाश गायकवाड - 5524समीर जाधव - 9059संदीप कदम - 513नोटा - 326कार्ला पं.स.रंजना गाकवाड - 6679रेश्मा देवकर - 7234अश्विनी भेगडे - 295नोटा - 199कुसगांव बुद्रुक पं.स.अविनाश जांभुळकर - 925योगेश लोहर - 7287नवनाथ हरपुडे - 3217नोटा - 180काले पं.स.शैला कालेकर - 10264सिमा ठाकर - 8110नोटा - 405सोमाटणे पं.स.साहेबराव कारके - 9218बाळासाहेब पारखी - 6790संभाजी लेंडघर - 156नोटा - 183चांदखेड पं.स.सुवर्णा घोटकुले - 7829सुनिता येवले - 10569नोटा - 211
Web Summary : In Maval, NCP (Ajit Pawar faction) swept the 2026 Zilla Parishad and Panchayat Samiti elections, securing all seats. They defeated BJP candidates, signaling a strong hold in local politics with a high voter turnout.
Web Summary : मावल में, NCP (अजित पवार गुट) ने 2026 जिला परिषद और पंचायत समिति चुनावों में सभी सीटें जीतकर दबदबा बनाया। उन्होंने भाजपा उम्मीदवारों को हराया, जो उच्च मतदान के साथ स्थानीय राजनीति में एक मजबूत पकड़ का संकेत है।