शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

Pune ZP : जिल्हा परिषदेत चारही सभापती बिनविरोध; ‘समन्वयातून जिल्हा परिषद ब्रँड’चा निर्धार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 11:43 IST

पुणे : जिल्हा परिषदेच्या चार विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी झालेल्या निवडणुकीत सर्व चारही पदाधिकारी बिनविरोध निवडून आले. समाजकल्याण सभापतिपदी जितेंद्र ...

पुणे : जिल्हा परिषदेच्या चार विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी झालेल्या निवडणुकीत सर्व चारही पदाधिकारी बिनविरोध निवडून आले. समाजकल्याण सभापतिपदी जितेंद्र बडेकर, महिला व बालकल्याण सभापतिपदी अंकिता पाटील, तर उर्वरित दोन सभापती म्हणून दीपाली हुलावळे आणि अमोल नलावडे यांची निवड करण्यात आली. तब्बल चार वर्षांनंतर या पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांनी विराजमान होताच जिल्हा परिषदेत राजकीय समन्वयाचे चित्र पाहायला मिळाले.

सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. निवडणुकीपूर्वी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. दुपारी एक वाजेपर्यंत सत्ताधारी राष्ट्रवादीकडून चार उमेदवारी अर्ज दाखल झाले. या दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे व उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांनी विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर विरोधी पक्षाने सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला. परिणामी, चारही जागांसाठी चारच उमेदवार रिंगणात राहिले. सर्वसाधारण सभेत चारही उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आल्यानंतर पीठासीन अधिकारी यशवंत माने यांनी चौघांची बिनविरोध निवड जाहीर केली. त्यानंतर अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, श्रीकांत खरात आदी मान्यवरांनी नवनिर्वाचित सभापतींचे स्वागत केले.

या निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पातळीवर सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. ‘फक्त निवडणुकीपुरता समन्वय नको, तर जिल्हा परिषदेला महाराष्ट्रात ‘ब्रँड’ बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे,’ असे मत उद्धवसेना गटनेते विजयसिंह शिंदे यांनी व्यक्त केले. ‘विरोधी पक्षात असलो तरी विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येऊन काम करू,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सभागृहात हलक्या फुलक्या शैलीत भाष्य करत वातावरण प्रसन्न केले. ‘जिल्हा परिषद ही आमदार घडवणारी शाळा आहे,’ असे म्हणत त्यांनी सदस्यांना प्रोत्साहित केले. त्यावर सभागृहात हशा पिकला. पुढील काळात सर्वांना सोबत घेऊन विकासकामांना गती दिली जाईल, तसेच कामकाजाची पद्धत, प्रस्ताव सादरीकरण याबाबत पदाधिकाऱ्यांना ‘यशदा’मध्ये प्रशिक्षण दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

एकूणच, बिनविरोध निवडीमुळे जिल्हा परिषदेत समन्वयाचे राजकारण बळकट होत असल्याचे चित्र असून, आगामी काळात विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Zilla Parishad: All four chairpersons elected unopposed, focus on branding.

Web Summary : Pune Zilla Parishad witnessed unopposed elections for four committee chairpersons. Focus is now on collaborative development and branding the Zilla Parishad, transcending political divides. Training is planned for officials.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रZilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६Puneपुणे