‘डिजिटल गव्हर्नन्स’मध्ये राज्यात पुणे जिल्हा परिषद अव्वल; सेवाकर्मी कार्यक्रमात ‘विशेष प्रशंसनीय कामगिरी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 15:43 IST2026-02-11T15:42:42+5:302026-02-11T15:43:18+5:30

याचबरोबर सेवाकर्मी कार्यक्रमात पुणे जिल्हा परिषदेची ‘विशेष प्रशंसनीय’ म्हणून निवड करण्यात आली आहे.

Pune Zilla Parishad tops the state in Digital Governance Specially commendable performance in the Sevakarmi program | ‘डिजिटल गव्हर्नन्स’मध्ये राज्यात पुणे जिल्हा परिषद अव्वल; सेवाकर्मी कार्यक्रमात ‘विशेष प्रशंसनीय कामगिरी’

‘डिजिटल गव्हर्नन्स’मध्ये राज्यात पुणे जिल्हा परिषद अव्वल; सेवाकर्मी कार्यक्रमात ‘विशेष प्रशंसनीय कामगिरी’

पुणे : मुख्यमंत्री यांच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील शासकीय कार्यालयांच्या कार्यक्षमतेचे स्पर्धात्मक मूल्यमापन करण्यात आले. या मूल्यमापनात पुणे जिल्हा परिषदेला २०० पैकी १९६.२५ गुणांसह राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. याचबरोबर सेवाकर्मी कार्यक्रमात पुणे जिल्हा परिषदेची ‘विशेष प्रशंसनीय’ म्हणून निवड करण्यात आली आहे.

कार्यालयाची अधिकृत वेबसाइट, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफिस, स्मार्ट डॅशबोर्ड, व्हॉट्सॲप एआय चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ब्लॉकचेन आणि भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) या सात प्रमुख घटकांवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शासकीय कार्यालयांचे मूल्यमापन करण्यात आले होते. या सर्वच निकषांवर पुणे जिल्हा परिषदेने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात आघाडी घेतली. याआधी मुख्यमंत्री १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमातही पुणे जिल्हा परिषदेने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला होता.

मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा परिषदेत डिजिटल प्रशासनाच्या क्षेत्रात अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले. यामुळे नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक व जलद सेवा मिळू लागल्या आहेत.

१५० दिवसांच्या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक शालिनी कडू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात यांच्यासह सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सीईओ गजानन पाटील यांनी विशेष कौतुक केले. सादरीकरण व समन्वयाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल सामान्य प्रशासन विभागाचेही विशेष अभिनंदन करण्यात आले. 

डिजिटल प्रशासन ही काळाची गरज असून, पुणे जिल्हा परिषद देशात एक मॉडेल म्हणून उभी राहील, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक आहे.  - गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे  

Web Title : डिजिटल गवर्नेंस में पुणे जिला परिषद शीर्ष पर; सराहनीय प्रदर्शन

Web Summary : पुणे जिला परिषद ने डिजिटल गवर्नेंस में महाराष्ट्र में पहला स्थान प्राप्त किया, 196.25/200 अंक हासिल किए। उन्होंने वेबसाइट, ई-ऑफिस, एआई चैटबॉट और जीआईएस सहित ई-गवर्नेंस पहलों में उत्कृष्ट प्रदर्शन किया। सीईओ गजानन पाटिल ने पारदर्शी और कुशल सेवाएं प्रदान करने में टीम के प्रयासों की सराहना की।

Web Title : Pune Zilla Parishad Tops in Digital Governance; Commendable Performance

Web Summary : Pune Zilla Parishad secured first rank in Maharashtra for digital governance, scoring 196.25/200. They excelled in e-governance initiatives, including website, e-office, AI chatbot, and GIS. CEO Gajanan Patil lauded the team's efforts in providing transparent and efficient services.