Pune ZP : पुणे जिल्हा परिषदेला १५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात राज्यात प्रथम क्रमांकाचा मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 13:36 IST2026-03-29T13:35:22+5:302026-03-29T13:36:23+5:30

- सेवाकर्मी प्लस कार्यक्रमातही प्रथम स्थानी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचा गौरव 

Pune Zilla Parishad ranked first in the state in the 150-day e-governance program | Pune ZP : पुणे जिल्हा परिषदेला १५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात राज्यात प्रथम क्रमांकाचा मान

Pune ZP : पुणे जिल्हा परिषदेला १५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात राज्यात प्रथम क्रमांकाचा मान

पुणे : मुख्यमंत्री यांच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत झालेल्या मूल्यमापनात पुणे जिल्हा परिषदेला २०० पैकी १९६.२५ गुण प्राप्त करून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे; सेवाकर्मी कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषदेची 'प्रथम' क्रमांकाने निवड झाली आहे. मुंबई येथील सह्याद्री सभागृहात पार पडलेल्या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

मुख्यमंत्री यांच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील शासकीय कार्यालयांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये सात महत्त्वाच्या घटकांवर- कार्यालयाचे संकेतस्थळ, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफिस, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सॲप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर तसेच भौगोलिक माहिती प्रणालीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची निवड करण्यात आली. श्री. गजानन पाटील यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून जिल्हा परिषदेने डिजिटल प्रशासनाच्या क्षेत्रात अभिनव उपक्रम राबवून नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक व जलद सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. 

जिल्हा परिषदेकडून इंटिग्रेटेड वर्क मॅनेजमेंट सिस्टीम, 'स्पंदन', ई-लॉटरी, क्यूआर कोड आधारित कर संकलन प्रणाली यांसारख्या नावीन्यपूर्ण प्रणाली विकसित करण्यात आल्या असून, यामुळे प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक झाले आहे. पुणे जिल्हा परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ हे द्विभाषिक, सुरक्षित व सुलभ असून नागरिकांना सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देते. 

'आपले सरकार' प्रणालीत १०० टक्के सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ई-ऑफिस प्रणालीमुळे कागदविरहित प्रशासनाला गती मिळाली असून हजारो नस्ती जलद निकाली काढण्यात आल्या आहेत. तसेच इंटिग्रेटेड स्मार्ट डॅशबोर्डद्वारे डेटा-आधारित निर्णय प्रक्रिया सक्षम झाली आहे. 'पुणे झेडपी संवाद' या व्हॉट्सॲप एआय चॅटबॉटद्वारे नागरिकांना माहिती व सेवा मिळत आहेत. एआय, ब्लॉकचेन आणि जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर करून मालमत्ता व्यवस्थापन, आरोग्य सेवा व विकास नियोजन अधिक प्रभावी करण्यात आले आहे. 

सेवाकर्मी कार्यक्रमातही विशेष कामगिरी -

सेवाकर्मी कार्यक्रमामध्ये 'विशेष प्रशंसनीय' म्हणून निवड होणे ही जिल्हा परिषदेच्या सेवा गुणवत्ता, नागरिक समाधान, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि डिजिटल सेवा विस्ताराची पावती मानली जात आहे. १५० दिवसांच्या कार्यक्रमातील यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक शालिनी कडू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात यांच्यासह सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमाच्या सादरीकरणात व सर्व घटकांच्या एकत्रीकरणात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल सामान्य प्रशासन विभाग व त्याच्या टीमचेही त्यांनी अभिनंदन केले. 

Web Title : पुणे जेडपी ई-गवर्नेंस कार्यक्रम में राज्य में शीर्ष पर

Web Summary : पुणे जिला परिषद ने ई-गवर्नेंस कार्यक्रम में 196.25/200 अंक प्राप्त कर महाराष्ट्र में पहला स्थान हासिल किया। एकीकृत प्रणालियों और एआई चैटबॉट सहित उनकी डिजिटल पहलों ने सेवा वितरण और दक्षता को बढ़ाया। सीईओ गजानन पाटिल को सम्मानित किया गया।

Web Title : Pune ZP Tops State in E-Governance Program: A Triumph

Web Summary : Pune Zilla Parishad secured the first rank in Maharashtra's e-governance program, scoring 196.25/200. Their digital initiatives, including integrated systems and AI chatbots, enhanced service delivery and efficiency. CEO Gajanan Patil was honored for this achievement.