Zilla Parishad Election : अजितदादांना मोठा धक्का! राष्ट्रवादीने झेडपीसाठी उमेदवारी नाकारताच माजी आमदार पुत्राने ठोकला रामराम, भाजपच्या वाटेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 10:07 IST2026-01-20T10:06:11+5:302026-01-20T10:07:48+5:30

राजेंद्र गावडे हे अजित पवार आणि विशेषतः दिलीप वळसे पाटील यांच्याशी एकनिष्ठ मानले जात होते.

Pune Zilla Parishad Election Big blow to Ajitdada! As soon as NCP rejected his candidacy for ZP, former MLA's son said goodbye, on the path of BJP | Zilla Parishad Election : अजितदादांना मोठा धक्का! राष्ट्रवादीने झेडपीसाठी उमेदवारी नाकारताच माजी आमदार पुत्राने ठोकला रामराम, भाजपच्या वाटेवर

Zilla Parishad Election : अजितदादांना मोठा धक्का! राष्ट्रवादीने झेडपीसाठी उमेदवारी नाकारताच माजी आमदार पुत्राने ठोकला रामराम, भाजपच्या वाटेवर

पुणे/शिरूर: पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर शिरूर तालुक्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. माजी आमदार पोपटराव गावडे यांचे पुत्र आणि दिलीप वळसे पाटील यांचे अत्यंत जवळचे सहकारी राजेंद्र गावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) रामराम ठोकला आहे. जिल्हा परिषदेची उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या गावडेंचा आज पुण्यात भाजपमध्ये जाहीर प्रवेश होणार आहे.

राजेंद्र गावडे हे अजित पवार आणि विशेषतः दिलीप वळसे पाटील यांच्याशी एकनिष्ठ मानले जात होते. मात्र, राष्ट्रवादीने त्यांना जिल्हा परिषदेसाठी डावलल्यामुळे शिरूरच्या राजकीय वर्तुळात नाराजीचे सूर उमटले होते. आपल्या समर्थकांचा मोठा गट सोबत घेऊन गावडेंनी कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वळसे पाटलांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला मोठे भगदाड पडले आहे.

भाजपची शिरूरमध्ये ताकद वाढणार
राजेंद्र गावडे यांच्या भाजप प्रवेशामुळे शिरूरमधील महायुतीच्या गणितात आता भाजपची बाजू भक्कम झाली आहे. "पक्षात निष्ठेला किंमत मिळत नसल्याने आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे हा निर्णय घेतल्याचे" गावडेंनी यावेळी सांगितले. पुण्यात झालेल्या या पक्षप्रवेशावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि शिरूरमधील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title : शरूर में टिकट न मिलने पर एनसीपी नेता भाजपा में शामिल

Web Summary : पूर्व विधायक पोपटराव गावडे के बेटे राजेंद्र गावडे ने एनसीपी द्वारा जेडपी टिकट से इनकार करने के बाद भाजपा में शामिल हो गए। यह दलबदल, एनसीपी और दिलीप वलसे पाटिल के गढ़ के लिए एक झटका है, जिससे चुनाव से पहले शिरूर में भाजपा मजबूत हुई है।

Web Title : NCP Leader Defects to BJP After Ticket Denial in Shirur

Web Summary : Rajendra Gawade, son of ex-MLA Popatrao Gawade, joined BJP after NCP denied him a ZP ticket. This defection, a blow to NCP and Dilip Walse Patil's stronghold, strengthens BJP in Shirur ahead of elections.