शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

पुणे : पूर्ववैमनस्यातून तरुणाची दगडानं ठेचून निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2018 10:45 AM

दौंड येथे पूर्ववैमनस्यातून एका तरुणाची दगडानं ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

केडगाव ( पुणे ) - दौंड येथे पूर्ववैमनस्यातून एका तरुणाची दगडानं ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाळू व गुंडगिरीतून उद्भवलेल्या वादातून स्वप्नील शेलार (वय 28 वर्ष)याची हत्या करण्यात आली आहे. रविवार  (5 ऑगस्ट) रात्री 9.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आखाड पार्टीनिमित्त स्वप्निल शेलारच्या घरी जेवणाच्या कार्यक्रमाचे  आयोजन  करण्यात आले होते. यावेळी संध्याकाळच्या सुमारास जेवणाचा डबा देण्यासाठी  स्वप्नील बाईकवरुन घरापासून 200 मीटर अंतरावर असणाऱ्या एकेरीवाडी -देलवडी रस्त्यावर नारायण शेलार यांच्या घरासमोर पोहोचला. 

याचदरम्यान, अज्ञात व्यक्तींनी स्वप्नीलवर धारदार शस्राने वार केला. तसेच डोक्यामध्ये मोठा दगडदेखील घातला. या घटनेत स्वप्नीलच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. पोलिसांनी याबाबतची माहिती मिळताच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाहून एक गावठी कट्टादेखील जप्त केला आहे. याप्रकरणी स्वप्नीलचा भाऊ विशाल शेलारनं यवत पोलिसात तक्रार दाखल केली असून  काही संशयित आरोपींची नावं समोर आली आहेत.   

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हाPuneपुणे