बिहारमधून आलेल्या दोघांकडून पुण्यातील तरुणाचा खून; पेट्रोलला पैसे देण्यास दिला होता नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 10:18 IST2022-07-21T10:18:06+5:302022-07-21T10:18:19+5:30

एक आरोपी बिहारला पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच केली अटक

Pune youth killed by two from Bihar Refusal to pay for petrol | बिहारमधून आलेल्या दोघांकडून पुण्यातील तरुणाचा खून; पेट्रोलला पैसे देण्यास दिला होता नकार

बिहारमधून आलेल्या दोघांकडून पुण्यातील तरुणाचा खून; पेट्रोलला पैसे देण्यास दिला होता नकार

पुणे : मूळचे बिहारमधील असलेले मित्र कामानिमित्त पुण्यात आले. त्यांनी एका तरुणाकडे पेट्रोल भरण्यासाठी पैसे मागितले. पैसे न दिल्याने चाकूने भोसकून त्या तरुणाचा खून केला. ही घटना नगर रस्ता परिसरातील वडगाव शेरीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली.

मोहम्मद गुलशाद यामिन अन्सारी (वय २०, रा. मुनावर सोसायटी, वडगाव शेरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पाेलिसांनी मोहम्मद मुस्तफा अन्सारी (वय २१) आणि सोहेल अन्सारी (वय २२, दोघेही रा. वडगाव शेरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपी सोहेल अन्सारीला अटक करण्यात आली आहे. आरोपी मूळचे बिहारमधील असून, ते कामानिमित्त पुण्यात आले हाेते.

अधिक माहितीनुसार, आरोपींनी मोहम्मद याच्याकडे गाडीत पेट्रोल भरण्यासाठी तीनशे रुपये मागितले होते. पैसे देण्यास मोहम्मदने नकार दिला. त्यानंतर आरोपींनी चाकूने मोहम्मदवर वार केले. या घटनेची माहिती मिळाल्यावर चंदननगर ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दिलीप पालवे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि तातडीने तपास सुरू केला. आरोपी बिहारला पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सोहेलला अटक केली. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदाराचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Read in English

Web Title: Pune youth killed by two from Bihar Refusal to pay for petrol