पुण्यात कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, वॉटर पार्कमध्ये झिपलायनिंग करताना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 14:24 IST2025-04-20T14:22:47+5:302025-04-20T14:24:30+5:30

Pune Water Park Horror: कुटुंबाच्या डोळ्यादेखत तरुणीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Pune Womans Ziplining Attempt Turns Fatal at Rajgad Water Park | पुण्यात कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, वॉटर पार्कमध्ये झिपलायनिंग करताना...

पुण्यात कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, वॉटर पार्कमध्ये झिपलायनिंग करताना...

पुण्यातील भोर परिसरात कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाला. संबंधित तरुणी झिपलायनिंग करण्यासाठी गेली असताना ३० फूट उंचीवरून जमिनीवर पडली. ताबडतोब तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी राजगड पोलिसांत आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

तरल अरुण आटपाळकर (वय, २८) असे मृत तरुणीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरल पुण्यातील नऱ्हे परिसरात वास्तव्यास होती. दरम्यान, शुक्रवारी ती आपल्या कुटुंबासोबत पुणे-सातारा महामार्गावरील वरवे खुर्द गावच्या हद्दीतील राजगड वॉटर पार्कला फिरायला गेली. या वॉटर पार्कमध्ये सर्व कुटुंब राईडचा आनंद लुटत होते. तरल हिला झिपलायनिंग करण्याचा मोह आवरला नाही. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तरल झिपलायनिंग करण्यासाठी गेली. रोपवरून चालत असताना तिने सुरक्षा दोर वरच्या बाजूला रेलिंग करण्याचा प्रयत्न केला. पण रेलिंगपर्यंत हात जात नसल्याने तिने जवळ असलेल्या लोखंडी स्टूलवर उभी राहून दोर लावण्याचा प्रयत्न केला. पण अचानक स्टूल हलला आणि ती ३० फूट उंचीवरून खाली जमिनीवर पडली.

यानंतर तिला तात्काळ नसरापूर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. पंरतु, तिथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास केला जात आहे. कुटुंबाच्या डोळ्यादेखत तरुणीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Pune Womans Ziplining Attempt Turns Fatal at Rajgad Water Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.