शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
2
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांना काढून टाकले; कुणी केली टीका?
3
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
4
७२ लाखांत घ्या लॅम्बोर्गिनीची मजा! देशातील पहिली इलेक्ट्रीक सुपर कार लाँच, १०० च्या स्पीडला...  
5
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकराचे सूचक विधान
6
लष्कराच्या ताफ्यात नवं हत्यार! अचूक निशाणा अन् करेक्ट कार्यक्रम; ड्रोनने डागली मिसाईल, DRDO ला मोठं यश
7
"मला इलॉन मस्कची गरज," आरोप-प्रत्यारोपांनंतर आता अचानक का बॅकफूटवर आले डोनाल्ड ट्रम्प?
8
Video : माणुसकीला काळीमा! कॅन्सरग्रस्त आजीला नातेवाईकांनी रस्त्यावर सोडले; व्हिडीओ व्हायरल
9
१० लाख नवीन नोकऱ्या, १० कोटी घरांना ब्रॉडबँड...दूरसंचार धोरणा 2025 चा मसुदा जारी
10
“CM फडणवीसांना साफ-सफाईची मोहीम घ्यावी लागेल, ४ मंत्री जाणार”; संजय राऊतांनी नावेच सांगितली
11
मुंबईच्या चाळीत जन्म, १५ व्या वर्षी शाळा सुटली; आज कोट्यवधींच्या कंपनीचे मालक! कोण आहे ही व्यक्ती?
12
मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली...
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लंडनमध्ये चहा पाजणारा 'हा' युवक कोण?; भारताशी आहे खास कनेक्शन
14
Crime: गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाजवळच...; घटना ऐकून पायाखालची जमीन सरकेल!
15
श्रावणात सापांचा कहर, एकाच घरातून निघाले 60 विषारी नाग; गावात भीतीचे वातावरण
16
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
17
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता
18
महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी
19
Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?
20
PM मोदी यांनी इंदिरा गांधींनाही टाकलं मागे, ठरले सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे दुसरे व्यक्ती; त्यांचे हे महाविक्रम जाणून तुम्हीही थक्क व्हाल

Pune Winter News : पुण्यात थंडीची लाट; एनडीए ६ अंशावर तर शिवाजीनगर ७ अंशावर..!

By श्रीकिशन काळे | Updated: December 16, 2024 15:41 IST

थंडीचा कडाका पुन्हा एकदा सुरू झाला असून थंडीने पुणेकरांना गारठले

पुणे : थंडीचा कडाका पुन्हा एकदा सुरू झाला असून, पुण्यात सोमवारी (दि.१६) शिवाजीनगर ७.८ अंशावर तर एनडीए ६.१ अंशावर होते. त्यामुळे पुणेकर एकदम गारठून गेले. पहाटे घराबाहेर पडल्यानंतर हाताचा बर्फ झाला की, काय अशीच अवस्था अनुभवायला मिळाली.सध्या राज्यभर थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. त्यात पुण्यातही थंडीने पुणेकरांना गारठून टाकले आहे. किमान तापमानात सोमवारी (दि.१६) प्रचंड घट झाली. यंदाच्या हंगामातील आतापर्यंतच्या नीचांकी तापमानाची नोंद आज झाली. गेल्या काही दिवसांत शहरातील हवामानात सातत्याने चढ-उतार होत आहे. दिवाळीमध्ये पुणेकरांना थंडीची जाणीव झाली नाही. थंडी गायब झाल्याचे तेव्हा बोलले गेले. पण त्यानंतर मात्र थंडीला सुरवात झाली. काही दिवस थंडी पडली आणि पुन्हा गायब झाली. आता पुन्हा तापमानाचा पारा घसरला आहे.राज्यामध्ये सातत्याने दिवसा आणि रात्रीच्या तापमानात घट होत आहे. त्यामुळे पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), शिवाजीनगर, शिरूर, माळीण, दौंड, बारामती या काही ठिकाणी किमान तापमान एक आकडी नोंदवले गेले. पुण्यामध्ये ६ ते ७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. दिवसादेखील हुडहुडी भरेल, एवढा गारवा वातावरणात आहे.  हवामान विभागानूसार सोमवारी (दि.१६) एनडीए येथे सर्वांत कमी ६.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तसेच शिवाजीनगर येथे ७.८, शिरूर ६.२, माळिण ७.३, दौंड ७.३, बारामती ७.३, तळेगाव ८.३, राजगुरूनगर ८.५, इंदापूर ९.७ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. पुण्यातील किमान तापमानएनडीए : ६.१शिरूर : ६.२माळिण : ७.३दौंड : ७.३बारामती : ७.३शिवाजीनगर : ७.८तळेगाव : ८.३आंबेगाव : ८.५पुरंदर : ९.३इंदापूर : ९.७नारायणगाव : १०.०लवासा : ११.९कोरेगाव पार्क : १३.१वडगावशेरी : १४.५लोणावळा : १५.१मगरपट्टा : १५.५

पुण्यासह राज्यभरात थंडीची लाटसदृश स्थिती निर्माण झालेली आहे. राज्यात आणि पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी आज सोमवारी एक आकडी तापमानाची नोंद झाली. ही थंडी आणखी काही दिवस राहण्याचा अंदाज आहे. -माणिकराव खुळे, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ, पुणे

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनweatherहवामान