पुणे विद्यापीठात करार पद्धतीने भरणार ५२ सहायक प्राध्यापक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 19:13 IST2025-09-03T19:10:19+5:302025-09-03T19:13:46+5:30
आजपासून करता येणार अर्ज; अंतिम मुदत १३ सप्टेंबर

पुणे विद्यापीठात करार पद्धतीने भरणार ५२ सहायक प्राध्यापक
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने करार पद्धतीने सहायक प्राध्यापक भरती करण्याची प्रक्रिया जाहीर केली आहे. यासाठी गुरुवार (दि.४)पासून अर्ज करता येणार आहे. यासाठी १३ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यात निवड झालेल्या उमेदवाराला प्रतिमहिना (एकत्रित) ४० हजार रुपये मानधन मिळणार आहे. सदर निवड ३१ मे २०२६ पर्यंत ग्राह्य धरली जाईल, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
यात एकूण ५२ पदे भरण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रवर्गनिहाय विचार करता एससी प्रवर्गात दाेन जागा भरण्यात येणार आहेत. त्यातील सर्वसाधारण १ आणि महिलेसाठी १ जागा आहे. एसटी प्रवर्गात एकूण सहा जागा भरल्या जातील. त्यातील सर्वसाधारण ४ आणि महिलेसाठी २ जागा आहेत. डीटी-ए प्रवर्गासाठी ३ जागा आहेत. त्यातील सर्वसाधारण २ आणि महिलेसाठी १ जागा आहे.
एनटी-बी प्रवर्गात २ जागा असून, प्रत्येक १, अशी विभागणी आहे. एनटी-सी प्रवर्गात एकच जागा असून, ती सर्वसाधारण गटात आहे. एनटी-डी गटात ३ जागा आहेत. त्यातील २ जागा सर्वसाधारण, तर १ जागा महिलेसाठी राखीव आहे. एसबीसी प्रवर्गात एकच जागा आहे. ओबीसी प्रवर्गामध्ये ८ जागा आहेत. त्यातील ६ जागा सर्वसाधारण आणि महिलेसाठी २ जागा राखीव आहेत. एसईबीसी १२ आणि ईडब्ल्यूएस १२ जागा भरल्या जाणार आहेत. त्यातही सर्वसाधारण प्रत्येकी ७, महिलांसाठी प्रत्येकी ४ आणि क्रीडा व्यक्तीसाठी प्रत्येकी १ जागा रिक्त आहे. खुला गटासाठी २ जागा आहेत. त्यातही सर्वसाधारण आणि महिला, अशी एक- एक जागा आहे. विषयनिहाय माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.