Pune University ची बनावट प्रमाणपत्रं बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तीन जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 06:41 PM2021-09-27T18:41:49+5:302021-09-27T18:43:33+5:30

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी; या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

Pune University gang making fake certificates exposed | Pune University ची बनावट प्रमाणपत्रं बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तीन जण ताब्यात

Pune University ची बनावट प्रमाणपत्रं बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तीन जण ताब्यात

Next
ठळक मुद्देबनावट प्रमाणपत्राचा उपयोग करणाऱ्यांवरही कारवाई होणार

नीरा : पुणे विद्यापीठासह अन्य महाविद्यालयांची बनावट प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका बनवणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी नीरा येथे धाड टाकत तिघांना ताब्यात घेत त्यांच्यावर जेजूरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या या दमदार कामगिरीमुळे बनावट प्रमाणपत्र आणि गुणपत्रिकांचा मोठा घोटाळा समोर आला आहे. गणेश संपत जावळे (रा. नीरा), मनोज धुमाळ (रा. नीरा) आणि वैभव लोणकर (रा. बारामती) या तिघांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इतर महाविद्यालयांची बनावट प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका बनवून त्यांची विक्री केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप येळे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पुणे विद्यापीठाकडे याबाबत शहानिशा करून घेतली. त्यानंतर नीरा येथील समीक्षा प्रिंटिंग प्रेसमध्ये धाड टाकली असता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका बनवण्याचे काम सुरू असल्याचे समोर आले. त्यांच्यावर जेजूरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.

बनावट प्रमाणपत्राचा उपयोग केला त्यांच्यावरही कारवाई होणार 

नीरा येथील बनावट प्रमाणपत्र बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर या टोळीचे बनावट प्रमाणपत्र बनवण्याचे काम ते किती दिवसांपासून करत होते ? तसेच हे प्रमाणपत्र आजपर्यंत किती जणांना दिली आहे. व त्यापासून कित्येकांनी या बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरीसाठी, पुढील शिक्षणासाठी व बढतीसाठी, वेतनवाढीसाठी उपयोग केला आहे, हे तपासणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे बनावट प्रमाणपत्र बनवणारी जेवढे गुन्हेगार तेवढाच त्या बनावट प्रमाणपत्रांचा फसवणूक करून वापर करणाऱ्या व्यक्ती ही गुन्हेगार आहेत. त्यामुळे आता ज्यांनी या बनावट प्रमाणपत्राचा उपयोग केला आहे, त्यांच्यावरही कारवाई होणार का हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

बनावट नोटांनतर आता बनावट प्रमाणपत्र

नीरेत वीस वर्षांपूर्वी याच सणासुदीच्या काळात बनावट नोटांचे रँकेट उघड झाले होतो. नीरा पोलीस दुरक्षेत्राचे ततकालीन फौजदार अनिल जाधव यांनी त्यावेळी नोटा बाजारपेठेत येण्या आधीच पकडले होते. आता मात्र गेली कितेक वर्ष हे बनावट प्रमाणपत्र बनवले जात असल्याची दबक्या आवाजात चर्चा नीरा सह परिसरात होती.

Web Title: Pune University gang making fake certificates exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app