साैरऊर्जा प्रकल्प सुरु करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ठरले देशातील पहिले विद्यापीठ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 07:16 PM2018-09-06T19:16:37+5:302018-09-06T19:20:47+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात साैरउर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात अाला अाहे. पहिल्या टप्प्यात विद्यापीठातील सहा इमारतींसाठी हा प्रकल्प सुरु करण्यात अाला अाहे.

pune university is the first university to start using solar energy resourses | साैरऊर्जा प्रकल्प सुरु करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ठरले देशातील पहिले विद्यापीठ

साैरऊर्जा प्रकल्प सुरु करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ठरले देशातील पहिले विद्यापीठ

Next

पुणे : देशभरात साैरऊर्जेचा वापर करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे पहिले विद्यापीठ ठरले अाहे. ग्रीन एनर्जी मिशनमध्ये पुणे विद्यापीठाने पुढाकार घेतला अाहे. एकूण चाैदा इमारतींवर साैरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात सहा इमारतींसाठी साैरऊर्जा प्रकल्प सुरु करण्यात अाला अाहे, अशी माहिती कुलगुरु डाॅ. नितीन करमळकर यांनी दिली. 


    सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन कुलगुरू डाॅ. नितीन करमळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम उपस्थित होते. विद्यापीठातील आंतरशाखीय ऊर्जा अभ्यासप्रणाली विभागांतर्गत ६०२ किलोवॅट पीट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे कामकाज पाहिले जात आहे. या प्रकल्पाविषयी माहिती देताना आंतरशाखीय ऊर्जा अभ्यासप्रणाली विभागाचे संचालक डॉ. संदेश जाडकर म्हणाले की, या प्रकल्पासाठी विद्यापीठ आवारातील सर्व इमारतींचे निरीक्षण करण्यात आले. त्यामधील १४ इमारतींवर हा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात पुढील सात इमारतींवर हा प्रकल्प २० सप्टेंबर २०१८ पर्यंत कार्यान्वित केला जाईल.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये - 
१. अक्षय आणि नवीकरणक्षम ऊर्जा विभागाच्या वतीने विद्यापीठातील आंतरशाखीय ऊर्जा अभ्यासप्रणाली विभागांतर्गत हा एकूण ६०२ किलोवॅट पीट क्षमतेचा हा प्रकल्प आहे.
२. केंद्र शासनाच्या सेकी - सोलर एनर्जी कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या मान्यतेनंतर या प्रकल्पाचे काम क्लीनमॅक्स या कंपनीला देण्याचे विद्यापीठ प्रशासनाने ठरवले.
३. या प्रकल्पासाठी येणारा सर्व खर्च क्लीनमॅक्स कंपनीच्या वतीने करण्यात येणार आहे.
४. यामध्ये पहिल्या टप्प्यात विधी विभाग, सेंटर फॉर मॉडेलिंग अॅन्ड सिम्युलेशन, आंबेडकर भवन, जयकर ग्रंथालय, कॅप भवन, डिपार्टमेंट आॅफ टेक्नॉलॉजी या इमारतींवर सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.
५. या प्रकल्पामुळे विद्यापीठ आवारातील ऊर्जेच्या गरजेतील ३५.५ लाख इतक्या रकमेच्या विजेची दर वर्षी बचत होणार आहे. यामधून अंदाजे ८ लाख ७२ हजार ९०० किलोवॅट (kWh) इतकी ऊर्जा वाचेल अशी अपेक्षा आहे. 
६. यामुळे पुढील २५ वर्षांसाठी प्रतिवर्ष ७१६ टन कार्बन उत्सर्जन कमी करण्यास सहाय्य मिळणार आहे. कमी होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचा विचार करता, हा प्रकल्प म्हणजे सुमारे १७ हजार ४२० इतक्या वृक्षांची लागवड करण्यासारखेच आहे.

Web Title: pune university is the first university to start using solar energy resourses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.