Pune Traffic : वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे स्वारगेट चौकाला कोंडीचे ग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 15:43 IST2024-12-27T15:38:05+5:302024-12-27T15:43:38+5:30

-स्वारगेट चौकातून जाणाऱ्या पादचाऱ्याला कोणी रस्ता देता का रस्ता?

Pune Traffic Swargate Chowk is in a mess due to indiscipline of drivers. | Pune Traffic : वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे स्वारगेट चौकाला कोंडीचे ग्रहण

Pune Traffic : वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे स्वारगेट चौकाला कोंडीचे ग्रहण

-रिक्षा, खासगी ट्रॅव्हल्स, एसटीचालकांना कधी शिस्त लागणार?

-दिवसभरात लाखो वाहनांची ये-जा; पण शिस्तीचा अभाव

पुणे :
शहराचे मध्यवर्ती ठिकाण म्हणजे स्वारगेट. या चौकातून दररोज लाखो वाहनांची ये-जा असते. शिवाय बाहेर गावावरुन येणाऱ्या हजारे प्रवासी याच ठिकाणावरुन पुढे जातात. मुख्य स्वारगेट बसस्थानक, शेजारीच पीएमपी थांबा, रिक्षाचालकांची बेशिस्त, ट्रव्हल्सवाल्यांचा मुजोरपणा शिवाय बेशिस्तपणांचा कळस म्हणजे सिग्नल सुरु असले तरी बिनधास्तपणे सिग्लन तोडून पुढे जाणे. यामुळे या चौकात दिवसभर वाहतूक कोडी होते. त्यामुळे चौक पार करताना प्रवाशांना दिव्य कसरत करावा लागत आहे. या चौकाला लागलेली कोंडीचे ग्रहण कधी सुटणार असा प्रश्न पडला आहे.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या स्वारगेट चौकात चारही बाजूने वाहनांची ये-जा सुरु असते. मुख्य प्रवेशद्वार असल्यामुळे या चौकात दिवसरात्र वाहनांची वर्दळ असते. सकाळी आठ ते रात्री दहापर्यंत तर चौक ओलांडून जाणे म्हणजे पादचाऱ्यांना दिव्य कसरत करावा लागतो. परंतु या सर्व गोष्टीला बेशिस्त वाहनचालकच जबाबदार असून, या ठिकाणची कोंडी कधी सुटणार आणि वाहनधारकांना कधी शिस्त लागणार असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत. तसेच शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, कात्रज रस्ता, हडपसर रस्ता, सिंहगड रस्ता यांच्या मध्यभागी हा चौक येतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणत वाहनांची या चौकातून वर्दळ असते. त्याचबरोबर जवळच प्रसिद्ध व्यापारी पेठा, प्रशासकीय इमारती, स्वारगेट बसस्थानक, शिक्षण संस्था असल्याने सहजकीच नागरिकांची मोठ्या प्रमाणात या भागात ये-जा असते. स्वारगेट चौकात एसटीचे प्रमुख बसस्थानक असल्यामुळे दिवसभरात हजारो एसटी या ठिकाणावरुन ये-जा करतात. परंतु बसस्थानकात जागा कमी असल्यामुळे सकाळी व संध्याकाळी बाहेरपर्यंत लांब रांगा लागते. त्यामुळे वाहतूक कोंडी होते.

एसटीच्या बसस्थानकाबाहेर रांगा

स्वारगेट बसस्थानकातून संध्याकाळी ये-जा करणाऱ्या एसटीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातुलनेत बसस्थानकात जागा कमी आहे. शिवाय बसचालक वाटेल तसे एसटी उभी करतात. त्यामुळे मागून येणाऱ्या एसटीला बसस्थानकात जाण्यासाठी जाग नसते. त्यामुळे बसस्थानकबाहेर बस उभे करतात. जशी संख्या वाढेल तसे बसची रांग लांबत जाते. त्यामुळे रस्ता पूर्ण अडवला जातो. याचा मनस्ताप सर्वसामान्य नागरिकांसह प्रवाशांना सहन करावा लागतो.

रिक्षा, खासगी ट्रॅव्हल्सचालकांची बेशिस्त

एसटीच्या प्रवाशांना घेण्यासाठी भर चौकात रिक्षाचालकांनी रिक्षा उभे करतात. त्यामुळे रस्त्यामध्ये वाहतूककोंडी होते. शिवाय संध्याकाळी या चौकातून जाणाऱ्या वाहनांची सख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रस्ता कमी आणि वाहने जास्त अशी परिस्थिती असते. तर दुसरीकडे खासगी ट्रॅव्हल्स भर चौकात उभ्या असतात. त्यामुळे हडपसरकडे जाणारा रास्ता गर्दीमुळे जम होते. परिणामी चौकात कोंडी होते. यामुळे रिक्षाचालक आणि खासगी ट्रॅव्हल्सधारकांना शिस्त कधी लावणार असा प्रश्न पडला आहे.

मेट्रोच्या कामाचाही मनस्ताप

स्वारगेट चौकात अजूनही मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे बसस्थानकाशेजारी बॅरिकेट्स लावण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना येथून मार्गक्रमण करताना कसरत करावी लागते, त्यातच बेशिस्त रिक्षाचालकांमुळे नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागते. भाडे मिळवण्यासाठी स्वारगेट चौकात साधारणतः तीनशेच्या आसपास रिक्षा उभ्या असतात. एकाच ठिकाणी रिक्षा मोठ्या प्रमाणात गोळा होतात, त्यामुळे सर्व शहराच्या मध्यवर्ती भागातील स्वारगेट चौक कायमच राहदरीने व्यापला जातो. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रचंड वाहतूक कोंडी होते.

हे आहेत वाहतूक कोंडीचे कारणे

- मोठ्या प्रमाणात खासगी ट्रॅव्हल्स भर चौकात उभ्या असतात.

-स्वारगेट बसस्थानकाचे योग्य व्यवस्थापन नाही.

-खासगी रिक्षाचालकांची संख्या मोठ्या प्रमाणात.

-खासगी वाहनांची वाढलेली बेसुमार संख्या.

-पोलीस प्रशासनाचे वाहतूक नियोजनत अपयश

-मेट्रोची सुरु असलेली कामे.

Web Title: Pune Traffic Swargate Chowk is in a mess due to indiscipline of drivers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.