Pune Traffic : महापालिकेचे आता मिशन १७ रस्ते; या रस्त्याची कामे सुपर फास्ट होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 12:39 IST2025-02-14T12:38:16+5:302025-02-14T12:39:18+5:30

महापालिकेने पहिल्या टप्प्यात हाती घेतलेल्या १५ रस्त्यांची कामे जवळपास पूर्ण झाली

Pune Traffic Municipal Corporation now has Mission 17 roads | Pune Traffic : महापालिकेचे आता मिशन १७ रस्ते; या रस्त्याची कामे सुपर फास्ट होणार

Pune Traffic : महापालिकेचे आता मिशन १७ रस्ते; या रस्त्याची कामे सुपर फास्ट होणार

पुणे : शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करून वाहतुकीचा वेग वाढविण्यासाठी पुणे महापालिकेने आता नव्याने १७ रस्त्यांची निवड केली आहे. त्याअंतर्गत 'मिशन १७' हाती घेतले असून, या रस्त्याची कामे सुपर फास्ट होणार आहेत.

महापालिकेने पहिल्या टप्प्यात हाती घेतलेल्या १५ रस्त्यांची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. त्यानंतर आता आणखी नव्याने १७ रस्त्यांची निवड केली असून, या रस्त्यांवरील सर्व अतिक्रमणे हटवून, चेंबर दुरुस्ती, अनावश्यक ठिकाणचे ग्रेड सेपरेटर काढून त्यांचे नव्याने डांबरीकरण केले जाणार आहे.

याबाबत पावसकर म्हणाले की, 'मिशन १७' अंतर्गत निवड केलेल्या सर्व रस्त्यांचा आता सर्व्हे सुरू केला आहे. या रस्त्यांवरील कोणकोणत्या बाबींवर कामे करावी लागणार आहेत, त्याची यादी करण्यात येत असून, त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे.

हे आहेत रस्ते

सासवड रस्ता, कात्रज-मंतरवाडी बायपास, जुना एअरपोर्ट रस्ता, आळंदी रस्ता, जुना पुणे-मुंबई हायवे, शास्त्री रस्ता, नेहरू रस्ता, टिळक रस्ता, साधू वासवानी रस्ता, बंडगार्डन रस्ता, डॉ. आंबेडकर रस्ता, एम.जी. रस्ता, प्रिन्स ऑफ बेल्स रस्ता, कोंढवा मुख्य रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, सेनापती बापट रस्ता या रस्त्यांचा समावेश आहे.

Web Title: Pune Traffic Municipal Corporation now has Mission 17 roads