रमजान ईदनिमित्त गोळीबार मैदान चौकात वाहतूक बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 08:55 IST2026-03-21T08:55:18+5:302026-03-21T08:55:41+5:30

- ‘गोळीबार मैदान चौकातील इदगाह मैदान येथे रमजान ईदनिमित्त नमाज पठणासाठी मुस्लीम बांधवांची मोठी गर्दी होते.

pune traffic changes at Golib Maidan Chowk on the occasion of Ramadan Eid | रमजान ईदनिमित्त गोळीबार मैदान चौकात वाहतूक बदल

रमजान ईदनिमित्त गोळीबार मैदान चौकात वाहतूक बदल

पुणे : रमजान ईदनिमित्त शनिवारी (दि. २१) लष्कर भागातील इदगाह मैदान येथे सामूहिक नमाज पठण करण्यात येणार आहे. सकाळी ६ ते साडेअकरा वाजेपर्यंत लष्कर भागातील गोळीबार मैदान चौकातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार असून, वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

‘गोळीबार मैदान चौकातील इदगाह मैदान येथे रमजान ईदनिमित्त नमाज पठणासाठी मुस्लीम बांधवांची मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी ६ ते साडेअकरा वाजेपर्यंत या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा’, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.

गोळीबार मैदान चौकातून स्वारगेटकडे जाणारी जड वाहने ही पुणे-सोलापूर रस्त्यावरील भैरोबा नाला चौकातून वानवडी, लुल्लानगर चौकातून इच्छितस्थळी जातील. गोळीबार मैदान चौकातून स्वारगेट किंवा शहरात येणाऱ्या वाहनांनी भैरोबा नाला चौकातून एम्प्रेस गार्डन, घोरपडीमार्गे इच्छितस्थळी जावे. लष्कर भागातील मम्मादेवी चौक ते गोळीबार चौक दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. सीडीओ चौकातून गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. गोळीबार मैदान चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी खटाव बंगला चौकातून नेपियर रस्तामार्गे बिशप स्कूल या रस्त्याचा वापर करावा. खटाव बंगला चौकातून उजवीकडे वळण्यास तात्पुरत्या स्वरूपात परवानगी देण्यात आली आहे.

स्वारगेटकडून सोलापूर रस्त्याने हडपसरकडे जाणाऱ्या वाहनांनी शंकरशेठ रस्त्यावरील चिमणराव ढोले पाटील चौकातून (सेव्हन लव्हज चौक) गुलटेकडी मार्ग सॅलिसबरी पार्क चौकाकडे जावे. खटाव बंगला चौकातून नेपियर रस्त्याने सोलापूर रस्त्याकडे जावे. खटाव बंगला चौकातून लुल्लानगरमार्गे वाहने सोलापूर रस्त्याकडे जातील. सोलापूर बाजार पोलिस चौकी ते गोळीबार मैदान चौक दरम्यानची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. लुल्लानगर चौकातून गोळीबार मैदान चौकाकडे येणाऱ्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

Web Title : पुणे: रमज़ान ईद की नमाज़ के लिए गोळीबार मैदान के पास यातायात परिवर्तन

Web Summary : पुणे में रमज़ान ईद की नमाज़ के लिए शनिवार, 21 जून को सुबह 6 बजे से 11:30 बजे तक गोळीबार मैदान के पास यातायात परिवर्तित किया जाएगा। भैरोबा नाला और एम्प्रेस गार्डन के माध्यम से वैकल्पिक मार्गों की सलाह दी जाती है। कुछ सड़कें बंद रहेंगी।

Web Title : Pune: Traffic diversions near Golibar Maidan for Ramadan Eid prayers.

Web Summary : Pune traffic will be diverted near Golibar Maidan on Saturday, June 21st, from 6 AM to 11:30 AM for Ramadan Eid prayers. Alternative routes are advised via Bhairoba Nala and Empress Garden. Some roads will be closed.