पुण्यात उद्या ५०० ठिकाणी 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 08:10 PM2019-02-23T20:10:12+5:302019-02-23T20:12:39+5:30

पंतप्रधानपदाची सुत्रे घेतल्यानंतर नियमितपणे गेली साडेचार वर्ष प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी देशवासियांबरोबर मन की बात करणाऱ्या नरेंद्र मोदी यांची या पंचवार्षिकमधील रविवारची मन की बात शहरात एकाच वेळी तब्बल ५०० ठिकाणी होणार आहे.

In Pune, tomorrow city BJP will present Man ki Baat at 500 places | पुण्यात उद्या ५०० ठिकाणी 'मन की बात'

पुण्यात उद्या ५०० ठिकाणी 'मन की बात'

Next

पुणे : पंतप्रधानपदाची सुत्रे घेतल्यानंतर नियमितपणे गेली साडेचार वर्ष प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी देशवासियांबरोबर मन की बात करणाऱ्या नरेंद्र मोदी यांची या पंचवार्षिकमधील रविवारची मन की बात शहरात एकाच वेळी तब्बल ५०० ठिकाणी होणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या शहर शाखेने या उपक्रमाचे आयोजन केले असून बूथ रचनेतील शक्तीकेंद्र प्रमुखांवर याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. खासदार अनिल शिरोळे यांनी मन की बातचे जाहीर आयोजन केले आहे.

                 आकाशवाणीवरून मोदी देशवासियांशी दर महिन्याच्या अखेरच्या रविवारी संवाद साधत असतात. लोकसभेच्या या पंचवार्षिकमधील त्यांचा हा बहुधा अखेरचा संवाद असेल. कारण पुढील महिन्यातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या अखेरच्या संवादाचा भाजपाच्या वतीने महोत्सवच आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी बूथ रचनेतील शक्तीकेंद्र प्रमुखांची मदत घेण्यात आली आहे.

                 शहरातील एकूण ५०० ठिकाणी रविवारी मोदींचा आवाज घुमेल. शक्तीकेंद्र प्रमुखाने त्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रात एका सभागृहाची, एका रेडिओची, ध्वनीवर्धकाची व्यवस्था करायची आहे. तसेच आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना तिथे निमंत्रीत करायचे आहे. सकाळी ११ वाजता मोदींचा संवाद सुरू होईल. तो सर्वांना ऐकू येईल. त्यानंतर उपस्थितांकडून कार्यकर्त्यांनी सुचना जमा करायच्या आहेत. त्यासाठी त्यांना कोरे कागद देण्यात येतील. केंद्र सरकारने आगामी काळात काय करावे, काय होणे गरजेचे आहे, कशाला प्राधान्य द्यावे अशा प्रकारच्या या सुचना आहेत. या सर्व सुचना नंतर भाजपाच्या केंद्रीय जाहीरनामा समितीकडे पाठवण्यात येणार आहेत.खासदार अनिल शिरोळे यांनी तर यासाठी जाहीर कार्यक्रमाचेच आयोजन केले आहे. शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयाजवळ असलेल्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात सकाळी १०.३० वाजता मोदी यांच्या मन की बातचे जाहीर प्रसारण होणार आहे. स्थानिक नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, ज्योत्स्ना एकबोटे, स्वाती लोखंडे, निलिमा खाडे हेही यावेळी उपस्थित असणार आहेत. 

Web Title: In Pune, tomorrow city BJP will present Man ki Baat at 500 places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.