Pune: टेम्पोने दुचाकीवरील मायलेकीला उडविले; बालिका ठार, आई जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 14:04 IST2024-02-03T14:03:35+5:302024-02-03T14:04:14+5:30

याप्रकरणी वानवडी पोलिसांनी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला....

Pune: Tempo blows away Mileki on a two-wheeler; Girl killed, mother injured | Pune: टेम्पोने दुचाकीवरील मायलेकीला उडविले; बालिका ठार, आई जखमी

Pune: टेम्पोने दुचाकीवरील मायलेकीला उडविले; बालिका ठार, आई जखमी

पुणे : भरधाव टेम्पोने दुचाकीस्वार महिलेला धडक दिल्याची घटना लुल्लानगर परिसरात घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तीन वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

शहाबानो सिराज खान (३) असे मृत बालिकेचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार सखिना सिराज खान किरकोळ जखमी झाल्या. टेम्पो चालक नरसिंह कावरे (रा. आंबेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सिराज फिरोज खान (३९, रा. सत्यम कशीश सोसायटी, कोंढवा) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अधिक माहितीनुसार, दुचाकीस्वार सखिना आणि त्यांची मुलगी शहाबानाे लुल्लानगर परिसरातून निघाल्या होत्या. पारशी काॅलनीसमोर भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीवरील शहाबानो गंभीर जखमी झाल्याने तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक गायकवाड पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Pune: Tempo blows away Mileki on a two-wheeler; Girl killed, mother injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.