एसटी बसचा फास्टॅग ठरला डोकेदुखी;खेड-शिवापूर टोलनाक्यावर पाऊण तास प्रवासी अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 17:08 IST2026-01-31T17:07:39+5:302026-01-31T17:08:01+5:30

प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाया गेला असून, अनेकांना नियोजित कार्यक्रमांना मुकावे लागले.

Pune ST bus FASTag became a headache; Passengers were stuck at Khed-Shivapur toll plaza for 15 minutes | एसटी बसचा फास्टॅग ठरला डोकेदुखी;खेड-शिवापूर टोलनाक्यावर पाऊण तास प्रवासी अडकले

एसटी बसचा फास्टॅग ठरला डोकेदुखी;खेड-शिवापूर टोलनाक्यावर पाऊण तास प्रवासी अडकले

पुणे : सांगलीहून पुण्याकडे येणाऱ्या एसटी बसचा फास्टॅग वारंवार स्कॅन न झाल्याने प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. खेड-शिवापूर टोलनाक्यावर फास्टॅग पूर्णपणे निष्क्रिय ठरल्याने तब्बल पाऊण तास बस थांबवून ठेवण्यात आली. यामुळे प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाया गेला असून, अनेकांना नियोजित कार्यक्रमांना मुकावे लागले.

बिबवेवाडी येथील रहिवासी विजय आकुर्डेकर हे पत्नीसमवेत पाच-सहा दिवसांपूर्वी सांगली-स्वारगेट एसटी बसने प्रवास करत होते. बसमध्ये सुमारे ३० ते ३५ प्रवासी होते. प्रवासाच्या सुरुवातीलाच पहिल्या टोलनाक्यावर फास्टॅग स्कॅन होण्यास विलंब झाला. पुढील टोलनाक्यावरही अशीच परिस्थिती निर्माण झाली. मात्र, खेड शिवापूर टोलनाक्यावर फास्टॅग अजिबात काम न केल्याने बस थांबविण्यात आली.

टोल कर्मचाऱ्यांनी रोख रक्कम भरल्याशिवाय बस पुढे सोडण्यास नकार दिला. मात्र, नियमांमुळे रोख पैसे भरणे शक्य नसल्याचे वाहक व चालकांनी स्पष्ट केले. परिणामी, टोलनाक्यावर वाहनांची लांबच लांब रांग लागली. मागील वाहनचालकांच्या सततच्या हॉर्नमुळे वातावरण तणावपूर्ण झाले आणि प्रवाशांचा संयम सुटू लागला. अखेर बस बाजूला लावण्यात आली. प्रवाशांनी एसटीच्या हेल्पलाईनवर संपर्क साधून अडचण कळवली. मात्र, तोडगा निघेपर्यंत आणखी दहा ते पंधरा मिनिटांचा विलंब झाला. अखेर जवळपास पाऊण तासानंतर बस पुढे रवाना झाली.

Web Title : एसटी बस के फास्टैग में खराबी से टोल प्लाजा पर घंटों देरी

Web Summary : पुणे के पास खेड़-शिवापुर टोल प्लाजा पर राज्य परिवहन की बस के फास्टैग में खराबी के कारण 45 मिनट की देरी हुई। फास्टैग के काम न करने से यात्रियों को असुविधा हुई, जिससे यात्रा कार्यक्रम बाधित हुए और निराशा हुई।

Web Title : Faulty FASTag on ST Bus Causes Hour Delay at Toll Plaza

Web Summary : A malfunctioning FASTag on a state transport bus caused a 45-minute delay at Khed-Shivapur toll plaza near Pune. Passengers faced inconvenience as the bus was held up due to the non-functional FASTag, disrupting travel schedules and causing frustration.