शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : टॅक्स भरूनही खड्ड्यांतून प्रवास...! पुणेकरांचा महापालिकेला संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 12:31 IST

-  मुंढवा–हडपसर मार्गाची दुरवस्था कायम; ‘ग्रँड टूर’साठी गुळगुळीत रस्ते, पण नागरिकांसाठी खड्ड्यांचा त्रास

पुणे: मुंढवा–हडपसर रेल्वे स्थानकाकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता गेल्या चार महिन्यांपासून अपूर्ण कामांमुळे अत्यंत धोकादायक बनला असून स्थानिकांनी त्याला “मृत्यूचा सापळा” अशी उपमा दिली आहे. दररोज हजारो नागरिक आणि प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात; मात्र मोठमोठे खड्डे, अर्धवट दुरुस्ती आणि सुरक्षा उपाययोजनांचा अभाव यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. व्हिडिओ शेअर करणाऱ्या नागरिकाने पुणे महापालिकेवर निष्काळजीपणाचा आरोप करत, दिवाळीपासून सुरू असलेली दुरुस्ती अजूनही पूर्ण न झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडी, धोकादायक रस्ते आणि खराब पृष्ठभागाचा सामना करावा लागत आहे.स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की, महापालिका कराच्या माध्यमातून मोठा महसूल गोळा करते; मात्र मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत आहे. “शहरात मोठ्या क्रीडा स्पर्धा आणि मॅरेथॉन आयोजित केल्या जातात, पण दैनंदिन वापराचे रस्ते सुरक्षित नसतील तर विकासाचा फायदा नेमका कुणाला?” असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, ‘बजाज ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी शहरातील काही रस्ते अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून गुळगुळीत करण्यात आले होते. त्या वेळी पुणेकरांनी या कामाचे स्वागत केले; मात्र स्पर्धा संपताच अनेक भागांतील खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. त्यामुळे “विशेष कार्यक्रमांसाठी झटपट कामे आणि सामान्य नागरिकांसाठी दुर्लक्ष” अशी टीका होत आहे.नागरिकांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून मुंढवा–हडपसर मार्गावरील कामे पूर्ण करावीत, ड्रेनेज झाकणांची उंचसखलता दुरुस्त करावी आणि सुरक्षित वाहतुकीसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर महापालिका यावर काय पावले उचलणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Citizens Angered by Pothole-Ridden Roads Despite Paying Taxes

Web Summary : Pune residents are furious about the dangerous, unfinished roads between Mundhwa and Hadapsar, despite paying taxes. They criticize the municipality for prioritizing events over basic infrastructure, demanding immediate action for safer roads.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडroad transportरस्ते वाहतूकPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रroad safetyरस्ते सुरक्षा