पोलिस भरती निमित्त ग्रामीण पोलिस मुख्यालय परिसरात वाहतूक बदल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 19:24 IST2026-02-12T19:23:35+5:302026-02-12T19:24:29+5:30

ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या परिसरातील अंतर्गत रस्ते दररोज पहाटे चार ते सायंकाळी सहा यावेळेत वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.

pune road diversion traffic changes in the rural police headquarters area on the occasion of police recruitment | पोलिस भरती निमित्त ग्रामीण पोलिस मुख्यालय परिसरात वाहतूक बदल 

पोलिस भरती निमित्त ग्रामीण पोलिस मुख्यालय परिसरात वाहतूक बदल 

पुणे : पोलिस भरती प्रक्रिया निमित्त पाषाण रस्त्यावरील पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या परिसरातील अंतर्गत रस्ते दररोज पहाटे चार ते सायंकाळी सहा यावेळेत वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. ग्रामीण मुख्यालयाच्या परिसरातील हे वाहतूक बदल १७ फेब्रुवारीपर्यंत लागू राहणार आहेत.

पोलिस भरती प्रकियेसाठी उमेदवारांची ग्रामीण मुख्यालयाच्या आवारात उमेदवारांची होणारी गर्दी विचारात घेऊन बुधवारपासून (दि. ११) वाहतूक बदल करण्यात आले आहेत. मंगळवार (दि. १७) पर्यंत या भागातील वाहतूक दररोज पहाटे चार ते सायंकाळी सहापर्यंत बंद राहणार आहे.

वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे. पाषाण रस्त्यावरील पोलिस अधीक्षक कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार ते बाणेर रस्त्यावरील पुरंदर हाॅल दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. पाषाण रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळील प्रवेशद्वार ते बाणेर रस्त्यावरील प्रवेशद्वार हा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.

Web Title : पुलिस भर्ती के कारण पुणे में यातायात परिवर्तन

Web Summary : पुलिस भर्ती के कारण पुणे के ग्रामीण पुलिस मुख्यालय क्षेत्र में यातायात परिवर्तन। मुख्यालय के पास की सड़कें 17 फरवरी तक प्रतिदिन सुबह 4 बजे से शाम 6 बजे तक बंद रहेंगी। वाहन चालकों को वैकल्पिक मार्गों का उपयोग करने की सलाह दी जाती है। पुलिस अधीक्षक कार्यालय और पुरंदर हॉल के बीच का मार्ग बंद रहेगा।

Web Title : Traffic Diversions in Pune Due to Police Recruitment Drive

Web Summary : Pune's rural police headquarters area faces traffic changes due to police recruitment. Roads near the headquarters will be closed daily from 4 AM to 6 PM until February 17. Motorists are advised to use alternative routes. Closures affect the stretch between the police superintendent's office and Purandar Hall.