पुण्यात रिक्षा चालकाची धारदार शस्त्रानं वार करुन हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 10:49 IST2018-10-07T10:48:27+5:302018-10-07T10:49:04+5:30

एका रिक्षा चालकावर धारदार शस्त्रानं सपासप वार करुन निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विश्रांतवाडी येथील शेलार घाट परिसरातील ही धक्कादायक घटना आहे. 

Pune : rickshaw driver murder with the help of sharp weapon | पुण्यात रिक्षा चालकाची धारदार शस्त्रानं वार करुन हत्या

पुण्यात रिक्षा चालकाची धारदार शस्त्रानं वार करुन हत्या

पुणे : एका रिक्षा चालकावर धारदार शस्त्रानं सपासप वार करुन निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विश्रांतवाडी येथील शेलार घाट परिसरातील ही धक्कादायक घटना आहे. अनिल धोत्रे (वय 37 वर्ष) असे हत्या करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीच्या किनारी असलेल्या शेलार घाट परिसरात एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. हत्या करण्यात आलेल्या अनिल धोत्रेला दारूचे व्यसन होते. शनिवारी (6 ऑक्टोबर) रात्री तो एका मित्रासोबत दारू प्यायला बसला होता. मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास धोत्रे आणि त्याचा आपापल्या घरी जाण्यास निघाले. 
पण धोत्रे घरी पोहोचलाच नाही. वाटेतच त्याची कोणीतरी हत्या केली. धोत्रेच्या चेह-यावर, डोक्यावर धारदार शस्त्रानं वार करुन त्याची हत्या करण्यात आली. हा प्रकार पूर्ववैमनस्यातून घडला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता पाटील याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Web Title: Pune : rickshaw driver murder with the help of sharp weapon