पुणेकरांनो लक्ष द्या...! धुळवडीनिमित्त दुपारी तीनपर्यंत मेट्रो सेवा बंद राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 12:17 IST2025-03-13T12:16:11+5:302025-03-13T12:17:01+5:30
पुणे मेट्रो प्रशासनाने प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे

पुणेकरांनो लक्ष द्या...! धुळवडीनिमित्त दुपारी तीनपर्यंत मेट्रो सेवा बंद राहणार
पुणे : शहरात धुळवड सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाताे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी सहा ते दुपारी तीनपर्यंत मेट्रो सेवा बंद राहणार आहे. त्यानंतर दुपारी तीन ते रात्री ११ वाजेपर्यंत नियमित सेवा सुरू राहणार आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी आणि मेट्रोला सहकार्य करावे, असे आवाहन मेट्रो प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
धुळवडीमुळे पुणे मेट्रोच्या वेळेत बदल
पुणे मेट्रो प्रशासनाने प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. धुळवड सणानिमित्त शुक्रवारी, १४ मार्च २०२५ रोजी पुणे मेट्रोची सेवा सकाळी ६:०० ते दुपारी ३:०० पर्यंत बंद राहणार आहे.
त्यानंतर दुपारी ३:०० वाजल्यापासून रात्री ११:०० वाजेपर्यंत मेट्रो सेवा नियमित सुरू होईल. प्रवाशांनी याची नोंद घेऊन आपल्या प्रवासाची योजना आखावी, असे आवाहन पुणे मेट्रो प्रशासनाने केले आहे.